एक्स्प्लोर
VIDEO : चीनमध्ये मेट्रोमधून उतरताना तरुणाची बोटं अडकली!
जियांग्सू : चालत्या ट्रेनमध्ये चढणं किंवा उतरणं किती धोकादायक ठरु शकतं याचं उदाहरण चीनमध्ये बघायला मिळालं. या घटनेत एक तरुण चालत्या ट्रेनमधून उतरत असताना, ट्रेनच्या ऑटोमॅटिक दरवाजात त्याची बोटं आडकली. यानंतर ट्रेननं त्याला लांबवर फरपटत नेलं.
चीनच्या जियांग्सूमध्ये हा तरुणाला मेट्रो ट्रेनमध्ये चढला. मात्र आपण चुकीच्या ट्रेनमध्ये चढलो आहे, हे लक्षात आल्यावर तो चालत्या ट्रेनमधून उतरु लागला. तो उतरलाही, पण त्याचा हात दरवाजात राहिला आणि ट्रेनचा ऑटोमॅटिक दरवाजा बंद झाला.
यात त्या तरुणाची बोटं दरवाज्यात अडकली आणि हा तरुण चालत्या ट्रेनसोबत जीवाच्या आकांताने धावू लागला. प्लॅटफॉर्मवरच्या लोकांनी ट्रेन चालकाला याची कल्पना देत ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला.
सुदैवानं ट्रेनचा वेग वाढण्याआधीच आपलं फसलेलं बोट बाहेर काढण्यात हा तरुण यशस्वी झाला. या तरुणाचा जीव वाचला असला, तरी या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement