एक्स्प्लोर

मोठी बातमी! जगभरातील मुस्लीम राष्ट्रे 'इस्लामिक नाटो' स्थापन करण्याच्या तयारीत, पाकिस्तानही सहभागी होणार; भारतावर काय परिणाम पडणार?

नाटो या संघटनेच्या धर्तीवर मुस्लीम राष्ट्रे इस्लामिक नाटो संघटना स्थापन करण्याच्या विचारात आहेत. या संघटनेत पाकिस्तानही सहभागी होऊ शकतो.

Islamic Nato: नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन अर्थात नोटो ही संघटना सर्वपरिचित आहे. या संघटनेच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या संघटनेत युरोपीय तसेच उत्तर अमेरिकन देशांचा समावेश आहे. ही संघटना म्हणजे वेगवेगळ्या देशांची लष्करी तसेच राजकीय युती असल्याचं म्हटलं जातं. दरम्यान, आता याच संघटनेच्या धर्तीवर मुस्लीम राष्ट्रे नवी संघटना स्थापन करण्याच्या विचारात आहेत. विशेष म्हणजे या नव्या संघटनेत पाकिस्तान देशदेखील सामील होणार आहे. परिणामी भारताची चिंता काही प्रमाणात वाढू शकते. 

मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद तसेच अन्य संकटांना तोंड देण्यासाठी जगभरातील 25 पेक्षा अधिक मुस्लीम राष्ट्रे एकत्र येण्याचा विचार करत आहेत. या संघटनेला इस्लामिक नाटो (Islamic Nato) किंवा मुस्लीम नाटो (Muslim Nato) असे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. मुस्लीम देशांची ही संभाव्य संघटना नाटो या संघटनेप्रमाणेच दहशतवादविरोधी कारवायांना थांबवण्यासाठी काम करणार आहे. 

आणखी कोणकोणते देश सहकारी होणार?

या संघनेत नेमके किती देश असतील हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र आसिया तसेच आफ्रिका खंडातील वेगवेगळे 25 मुस्लीम राष्ट्र या संघटनेत सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रस्तावित समूहात सौदी अरेबिया, पाकिस्तान, टर्की, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, बांगलादेश, अफगाणिस्तान, मलेशिया आदी देश सामील होण्याची शक्यता आहे. 

आणखी कोण-कोणते देश सामील होणार?

प्रस्तावित इस्लामिक नाटो समूहात इतरही देश सहकार्य करू शकतात. यामध्ये इंडोनेशिया, इराण, इराक, ओमान, कतार, कुवेत, मोरक्को, अल्जीरिया, ट्यूनीशिया आणि लीबिया आदी देश इस्लामिक नाटो या संघटनेचे सहयोगी बनू शकतात. सोबतच अझरबैजान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, ब्रुनेई हे देशही या संघटनेत सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

या संघटनेच्या निर्मितीचा उद्देश काय?  

मिळालेल्या माहितीनुसार नाटो या संघटनेसारखेच मुस्लीम राष्ट्राचे संघटन निर्माण करण्यामागे काही उद्देश आहे. दहशतवादाला थांबवण्यासाठी ही प्रस्तावित संघटना काम करणार आहे. सोबतच या संघटनेतील सदस्य राष्ट्र लष्करी बळ वाढवण्यास एकमेकांना मदत करणार आहेत. सदस्य राष्ट्रांमधील अंतर्गत स्थिरता तसेच बाह्य संकटांशी लढण्यासही हे देश एकमेकांना मदत करणार आहेत. 

भारतावर काय परिणाम पडणार?  

नाटो या संघटनेप्रमाणेच इस्लामिक नाटो ही संघटना उदयास आली तर त्याचा भारतावर अप्रत्यक्षपणे परिणाम पडू शकतो. पाकिस्तान हा एक मुस्लीमबहुल देश आहे. त्यामुळे हा देश इस्लामि नाटो संघटनेचा सदस्य होऊ शकतो. दुसरीकडे भारताचे पाकिस्तानसोबत फारसे चांगले संबंध राहिलेले नाहीत. जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताचे पाकिस्तानसोबत युद्धही झालेले आहे. त्यामुळे इस्लामिक नाटो या प्रस्तावित संघटनेत पाकिस्तान जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करू शकतो. परिणामी इस्लामिक नाटो संघटनेतील देश भारतावर दबाव टाकू शकतात. त्यामुळे भारतासाठी हे अडचणीचं ठरू शकतं. अर्थात ही संघटना अद्याप अस्तित्त्वात आलेली नाही. त्यामुळे भविष्यात नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी हत्याकांडांच थेट पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया कनेक्शन; पोलिस तपासातून माहिती समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray interview :…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही!   उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखतPriyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
×
Embed widget