World Oldest Person Died : जपानमधील (Japan) केन तनाका (Kane Tanaka) या जगातील सर्वात वृद्ध महिलाचे आज निधन झाले आहे. त्यांची जगातील सर्वात वृद्ध महिला म्हणून गिनीज वर्ल्ड रेकोर्डमध्ये त्यांची नोंद करण्यात आली होती. 2 जानेवारी 2022 रोजी केन तनाका यांचा 119 वा वाढदिवस होता. रिपोर्टनुसार, फुकुओका शहरातील एका नर्सिंग होममध्ये राहात होत्या. 


एका मुलाखतीमध्ये केन तनाका यांनी सांगितले की होते की, 'मी इतके वर्ष चांगल्या आहारामुळे आणि अभ्यास केल्यामुळे जिवंत आहे.'  त्या नर्सिंग होममधील कर्मचाऱ्यांसोबत हातांच्या इशाऱ्यांनी संवाद साधत होत्या. अंकगणित हा त्यांचा आवडता विषय होता. 


केन तनाका यांचा जन्म 2 जानेवारी 1903 मध्ये झाला. त्यांच्या आईवडीलांना सात मुलं होती. त्यापैकी केन तनाका या सातव्या महिला होत्या. 19 व्या वर्षी केन तनाका यांचे लग्न हिडियो तनाका यांच्यासोबत झाले. हिडिओ आणि केन तनाका यांना पाच मुलं आहेत. काने यांना मोतीबिंदू झाला होता. तसेच त्यांनी कॅन्सर सारख्या आजारावर देखील मात केली होती.


केन तनाका यांना बोर्ड गेम ऑथेलो खेळायला खूप आवडत होते.  तसेच केन तनाका ऑथेलो हा बोर्ड गेम नेहमी खेळत होत्या. त्या या खेळाच्या चॅम्पियन होत्या, असं त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :