Russia Ukraine War :  रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यामध्ये गेले दोन महिने युद्ध सुरू आहे. हे युद्ध 24 फेब्रुवारीला सुरू झाले. या युद्धात रशियाने युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त केली आहेत. सोशल मीडियावर या युद्धाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ गेले काही दिवस सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांच्या अंगावर शहारे आले.


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, दोन युक्रेनी सैनिक एकमेकांसोबत बोलत आहेत. तेवढ्यात एक युक्रेनी सैनिक त्याच्या खिशामधील फोन बाहेर काढतो. या सैनिकाच्या फोनमध्ये गोळी लागलेली दिसत आहे. ही गोळी फोनला लागल्यानं या युक्रेनी सैनिकाचा जीव वाचतो. हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तो सैनिक सांगतो की, त्याच्या फोनमध्ये  7.62 एमएमची गोळी लागली आहे. जर तो फोन त्या सैनिकाच्या खिशात नसता तर गोळी सैनिकाला लागली असती आणि त्याला त्याचा जीव गमवावा लागला असता.  


पाहा व्हिडीओ-



हा व्हायरल झालेला व्हिडीओ 53,782  नेटकऱ्यांनी पाहिला आहे.  Raw Ukraine Videos नावाच्या यु्ट्युब चॅनलनं 18 एप्रिल रोजी हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनेक नेटकरी या व्हिडीओला लाइक आणि कमेंट करत आहेत. 'That's pretty crazy', अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :