Mariupol Massacre : युक्रेनच्या मारियुपोल शहराबाहेर आणखी एक सामूहिक कबर सापडली आहे. नगराध्यक्षांच्या सल्लागारांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. सिटी काऊन्सिलने प्लॅनेट लॅबने घेतलेला एक सॅटेलाईट फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये सामूहिक कबर दिसून आली आहे. ही कबर 45 मीटर लांब आणि 25 मीटर रुंद आहे. या सामूहिक कबरीमध्ये मारियुपोलच्या किमान 1000 नागरिकांचे मृतदेह आढळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


मारियुपोलच्या पूर्वेला असलेल्या वायनोराडने गावाच्या बाहेर एक सामूहिक कबर सापडली आहे. सॅटेलाइट इमेजरी कंपनी मॅक्सार टेक्नॉलॉजीजने काढलेल्या पूर्वीच्या छायाचित्रांमध्येही मारियुपोलच्या पश्चिमेकडील मॅनहुस शहरात एकत्रितपणे 200 हून अधिक कबरी दाखवल्या होत्या. सामूहिक कबरीचा शोध लागल्यानंतर रशिया शहरातील नागरिकांची हत्या लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे.


एक लाख लोक अडकले
मारियुपोलच्या महापौरांनी शुक्रवारी युक्रेनच्या दक्षिणेकडील शहर पूर्णपणे रिकामे करण्याचं आवाहन केलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या शहराबद्दल म्हटले आहे की, 'हे शहर आता रशियन सैन्याच्या ताब्यात आहे.' महापौर वदिम बोइचेन्को यांनी राष्ट्रीय दूरदर्शनवर सांगितले की, 'सुमारे एक लाख युक्रेनियन लोक मारियुपोल शहरामध्ये अडकले आहेत. आम्ही नागरिकांच्या निर्वासनाची वाट पाहत आहोत. रशियन सैन्याकडून युक्रेनियन नागरिकांवरील हल्ले सुरुच आहेत.'


मारियुपोलवर रशियाच्या ताब्यात असल्याचा पुतिन यांचा दावा 
पुतीन यांनी गुरुवारी दावा केला आहे की, रशियन सैन्याने मारियुपोलवर ताबा मिळला आहे. परंतु युक्रेनियन अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनियन सैनिकांचा एक गट अजूनही अझोव्स्टल स्टील कॉम्प्लेक्सच्या भूमिगत बंकरमध्ये शेकडो नागरिकांसह मारियुपोलमध्येच आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :