World Malaria Day 2022 : जगभरात 25 एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन (World Malaria Day) साजरा केला जातो. जागतिक मलेरिया दिन हा मलेरिया प्रतिबंध, नियंत्रण आणि या आजाराचे निर्मूलन या गोष्टींबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.  जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2008 मध्ये सर्वप्रथम हा दिवस साजरा केला. मलेरिया हा आजार Plasmodium Parasites मुळे होतो. जाणून घेऊयात जागतिक मलेरिया दिनाची यंदाची थिम आणि मलेरियाची लक्षण...


जागतिक मलेरिया दिन 2022 ची थीम
दरवर्षी जागतिक मलेरिया दिनाची थीम वेगळी असते. यावर्षी मलेरिया दिनाची थीम, 'मलेरियाचे प्रमाण कमी करणे आणि लोकांचा जीव वाचवणे' अशी आहे. 


मलेरिया आजार हा डासांमुळे होतो. प्लास्मोडियम व्हायवॅक्स नावाच्या विषाणूमुळे हा आजार होतो. हा विषाणू अॅनोफिलीस हा मादी डास चावल्यानं मानवी शरीरात प्रवेश करतो. त्यानंतर हा बॅक्टेरिया यकृत आणि रक्त पेशींना पसरतात त्यामुळे तो व्यक्ती आजारी पडतो. मलेरिया पसरवणाऱ्या या मादी डासाच्या 5 प्रजाती आहेत.


मलेरिया आजाराची लक्षण 
डास चावल्यानंतर आठ दिवसाने मलेरियाची लक्षण सुरू होतात. ताप येणे, थकवा, स्नायू दुखणे, डोके दुखी, चक्कर येणे ही मलेरियाची लक्षण आहेत.  यामधील कोणतीही लक्षण जर तुम्हाला जाणवली तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध घेऊ शकतात. 







फॉलो करा या टिप्स


 मच्छरदानीचा वापर केल्यानं मलेरिया होणार नाही. तसेच घराच्या आजूबाजूला पाणी साठू देऊ नका. 


महत्वाच्या बातम्या :