Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 10 दिवसांपासून दहशतवादाचा आलेख अचानक वाढलेला पाहायला मिळत आहे. दोन दिवसांत जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला आणि सुंजवानमध्ये दोन मोठ्या दहशतवादी घटना घडल्या. शुक्रवारी संध्याकाळी नौगाममध्ये दहशतवाद्यांनी दोन मजुरांना गोळ्या घालून जखमी केले. जम्मू-काश्मीरमध्ये अचानक घडलेल्या दहशतवादी घटनांमुळे खोऱ्यात दहशतवाद धुमसत असल्याचं दिसून येतंय. याचा तपास केला असता, या घटनांचा थेट संबंध पाकिस्तानातील राजकीय बदलांशी जोडला गेला असल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानमध्ये 10 दिवसांपूर्वी सरकार बदलले आणि शाहबाज शरीफ पंतप्रधानपदावर विराजमान होताच काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटनांचा वाढल्या आहेत. शाहबाज शरीफ पंतप्रधान खुर्चीवर बसताच अनेक दहशतवादी घटना घडल्या, मात्र सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा डाव उधळून लावला.


जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा आलेख वाढला
बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी एका घराला आसरा घेण्याचे ठिकाण बनवले आणि तिथून गोळीबार केला. घरात लपलेल्या दहशतवाद्यांच्या गटात एक दहशतवादी अल्पवयीन होता. सुरक्षा दलांनी दहशतवादी लपलेले घर उडवून दिले. त्यानंतरही बारामुल्लामध्ये दहशतवागी हल्ले सुरुच होते. जम्मूतील सुंजवान आर्मी कॅम्पजवळ दहशतवाद्यांनी सीआयएसएफच्या बसला लक्ष्य केले. मात्र, सुरक्षा दलाच्या तत्परतेमुळे दोन्ही ठिकाणी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं. शाहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी घटनांवर एक नजर टाकूया.


शाहबाज शरीफ पंतप्रपधानांच्या खुर्चीवर बसताच दहशतवादी घटनांना वेग 



  • 11 एप्रिल : कुलगाम, अनंतनाग, बारामुल्ला येथे दहशतवादी घटना

  • 13 एप्रिल : कुलगाम आणि डोडा येथे हल्ले

  • 14 एप्रिल : शोपियानमध्ये दहशतवादी हल्ला

  • 15 एप्रिल : बारामुल्ला आणि राजौरी येथील घटना

  • 16 एप्रिल : अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला

  • 18 एप्रिल : पुलवामा आणि कुपवाडा येथील घटना

  • 19 एप्रिल : कुपवाडा येथे शस्त्रे जप्त

  • 21 एप्रिल : बारामुल्ला येथे हल्ला

  • 22 एप्रिल : सुंजवान, जम्मू येथे हल्ला


दहशतवादाचे शाहबाज कनेक्शन :
शाहबाज शरीफ यांनी 11 एप्रिल 2022 रोजी पाकिस्तानात पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना घडल्या.


11 एप्रिलपासून घडलेल्या दहशतवादी घटना



  • दहशतवादी घटना : 15

  • एकूण दहशतवादी ठार : 12

  • नागरिकांचा मृत्यू : 02

  • जवान शहीद : 03


शाहबाज शरीफ खुर्चीवर बसताच पाकिस्तानने खोऱ्यात नव्याने दहशतीचा खेळ कसा सुरू केला आहे, हे या आकडेवारीवरून दिसून येते. सध्या भारतीय सुरक्षा दल अत्यंत सतर्क असून दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचाली हाणून पाडण्यात येत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha