(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World's First Flight: 109 वर्षांपूर्वी पहिल्या प्रवासी विमानाचं उड्डाण, 42 किमीसाठी 23 मिनिटांचा वेळ; तिकीटाची किंमत तब्बल...
World's First Commercial Flight: पहिल्या प्रवाशी विमानाच्या तिकिटासाठी चक्क लिलाव करण्यात आला होता. प्रवाशाला बसण्यासाठी विमानात लाकडी सीट बनवण्यात आले होते.
World's First Commercial Flight : सध्या विमानाने प्रवास करणे ही फार मोठी गोष्ट राहिली नाही. पूर्वी विमानात बसणे म्हणजे एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखे होते. परंतु आता विमानसेवा ही सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याने सध्या प्रवासी विमान प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु सामान्यांसाठी विमानसेवा कधी सुरु झाली? कोणत्या देशात सुरु झाली? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. आज आपण पहिल्या विमान प्रवासासाठी प्रवाशांकडून किती दर आकारले? पहिल्या प्रवासी विमानाने कधी उड्डाण केले याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
जगातील पहिल्या विमानाने 109 वर्षापूर्वी म्हणजे 1 जानेवारी 1914 साली उड्डाण केले होते. अमेरिकेत पहिल्या विमानाने उड्डाण केले होते. अमेरिकेतील पीटर्सबर्ग ते टाम्पा दरम्यान पहिल्या प्रवासी विमानाने उड्डाण केले होते. तसे बघायला गेले तर या दोन शहरातील अंतर 42 किलोमीटर इतके आहे. परंतु या विमानाला हे अंतर पूर्ण करण्यासाठी त्यावेळी 23 मिनिटांचा वेळ लागला होता.
विमानाचे वजन तब्बल 567 किलो
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल प्रवाशाने एका फ्लाईंग बोटमधून प्रवास केला होता. या फ्लाईंग बोट विमानाला ट्रेनमधून सेंट पीटर्सबर्ग इथे पाठवले होते. फ्लाईंग बोट विमानाचे वजन 567 किलो एवढे होते. त्याची लांबी आठ मीटर आणि रुंदी 13 मीटर होती. या विमानात फक्त एक पायलट आणि एक प्रवासी बसेल एवढी जागा होती. प्रवाशाला बसण्यासाठी विमानात लाकडी सीट बनवण्यात आली होती.
पहिल्या प्रवासी विमानाच्या तिकिटासाठी करण्यात आला होता लिलाव
या विमानाच्या वैमानिकाचे नाव टोनी जेनस (Tony Jannus) होते. 1 जानेवारी 1914 साली विमानाने पहिल्यांदा प्रवाशासह उड्डाण केले होते. या विमानाचे तिकिटासाठी लिलाव करण्यात आला होता. कारण विमानात फक्त एका प्रवाशासाठी जागा होती. फील नावाच्या व्यक्तीने पहिले तिकीट खरेदी केले होते. हे जगातील पहिले विमानाचे तिकीट असून याची किंमत 400 डॉलर इतकी होती. भारतीय रुपयामध्ये सांगायचे झाले तर याची किंमत 6 लाख 02 हजार 129 एवढी होती.
या विमानाने पहिल्यांदा पाण्यावरुन उड्डाण केले. जेनसने विमानाला 50 फुटांपेक्षा अधिक उंचीवर गेले नव्हते. परंतु मध्येच विमानाचे एक इंजिन निकामी झाले. त्यावेळी जेनसने प्रसंगावधान दाखवत विमानाला एका खाडीच्या पृष्ठभागावर उतरवले आणि दुरुस्त केले. जेव्हा विमान टाम्पामध्ये उतरले. तेव्हा साडे तीन हजाराहून अधिक लोकांनी जानोस आणि फिल यांचे स्वागत केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :