जगातील सर्वात दुर्गंधी फुल, 12 फूट उंच; अनेक वर्षातून एकदा
Corpse Flower: जगात असं एक फूल आहे, जे त्याच्या दुर्गंधीमुळे ओळखलं जातं. हे फूल अतिशय दुर्मिळ आहे.
मुंबई : फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ती, विविध रंगीबेरंगी आणि सुवासिक फुले. पण जगातील असं एक फूल आहे, जे त्याच्या दुर्गंधीमुळे ओळखलं जातं. विशेष म्हणजे हे जगातील सर्वात दूर्मिळ फूल मूळचे इंडोनेशियातील असून त्याच्या दुर्गंधीमुळे ओळखलं जातं. होय, तुम्ही वाचताय ते खरं आहे, हे फूल अतिशय दुर्मिळ आहे. या आठवड्यात हे जगातील सर्वात दुर्मिळ फूल पहिल्यांदाच अमेरिकेच्या फोर्ट कॉलिन्समध्ये फुलणार आहे.
जगातील सर्वात दुर्गंधी फूल
जगातील सर्वात दुर्मिळ फुलाचं नाव कॉर्प्स फ्लॉवर (Corpse Flower) असं आहे. या फुलातून मृतदेहाप्रमाणे येणाऱ्या दुर्गंधीमुळे याचं नाव कॉर्प्स फ्लॉवर असं ठेवण्यात आलं आहे. कॉर्प्स म्हणजे शव. यामुळेच या फुलाला हे नाव मिळालं आहे. या फुलाचं वैज्ञानिक नाव अमॉर्फोफॅलस टायटॅनम (Amorphophallus Titanum) असं आहे. यालाच Titan Penis Flower असंही म्हटलं जातं.
अमेरिकेत फुललं यंदाच्या वर्षातील पहिलं कॉर्प्स फ्लॉवर
गेल्या आठवड्यात संयुक्त राज्य अमेरिकेच्या लॉसएंजेलिसमधील वनस्पती उद्यानामध्ये हे फूल फुललं होतं. हे फूल फक्त दोन ते तीन दिवसासाठी फुलतं, त्यानंतर ते कोमेजतं. मिळालेल्या माहितीनुसार, 2024 वर्षातील पहिले फूल 24 एप्रिल रोजी संध्याकाळी अमेरिकेत उमललं होतं, ज्याची लांबी 85 इंच होती. हे फूल अमेरिकेतही तब्बल सहा वर्षांनी बहरलं होतं.
CSU मध्ये कॉर्प्स फ्लॉवर फुलण्यासाठी तयार
कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटी (CSU) कॅम्पसमधील कंझर्व्हेटरीमध्ये कॉर्प्स फ्लॉवर फुलण्यासाठी तयार आहे. कॉर्प्स फ्लॉवर CSU च्या प्लांट ग्रोथ फॅसिलिटी कंझर्व्हेटरीमध्ये आहे. हे विद्यापीठाच्या कृषी विज्ञान महाविद्यालयाचा भाग आहे. हे झाड सुमारे आठ वर्षे जुनं असल्याचं मानलं जातं असून याचं टोपणनाव कॉस्मो असं ठेवण्यात आलं आहे.
या दूर्मिळ प्रजातीची 1,000 हून कमी फुले शिल्लक
इंडोनेशियामधील CSU's College of Agricultural Sciences' Conservatory 2016 पासून या फुलाची काळजी घेत असून आता त्यांची मेहनत सफल ठरली आहे. हे फुल फुलणार असून ते पाहण्यासाठी जगभरातील पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरचा माहितीनुसार, या दूर्मिळ प्रजातीची 1,000 पेक्षा कमी फुले उरली आहेत.
कुजलेल्या मांसाप्रमाणे फुलाचा वास
अमॉर्फोफॅलस टायटॅनम (Amorphophallus Titanum) हे फूल 8 फूट उंच वाढण्याची शक्यता आहे. जेव्हा हे फूल फुलते, तेव्हा त्यामधून दुर्गंधी येते. या फुलाचा वास कुजलेल्या मांसासारखा आहे, तर काहींच्या मते याचा वास कुजलेल्या माशा किंवा लसणासारखा असल्याचं सांगितलं जातं.
जगातील दूर्मिळ आणि उंच फूल
हे फूल जगातील दूर्मिळ फूलच नाही तर सर्वात उंच फूलही आहे. साधारणपणे त्याची उंची 12 फूट म्हणजे तीन मीटरपर्यंत असते. हे फूल फार वेळा आणि कमी दिवस बहरते. त्याच्या विशिष्ट आकारामुळे त्याला टायटन पेनिल फ्लॉवर (Titan Penis Flower) असंही म्हटलं जातं. हे फूल प्रामु्ख्याने इंडोनेशियातील सुमात्राच्या जंगलात आढळते.
फूल पाहण्यासाठी मोठी गर्दी
हे फूल अत्यंत दुर्मिळ आहे, यामुळे हे फुलल्यावर ते पाहण्यासाठी मोठी रांग लागते. अमेरिकेच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये याची अनेक झाले असून ती फुले अनेकदा उमलतात. इंडोनेशियातील सुमात्रा येथील जंगलात ही फुले पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. भारतातील केरळमध्येही आठ वर्षांपूर्वी हे फूल फुललं तेव्हा अनेक लोकांना ते पाहण्यासाठी रांगा लावल्या होत्या.हे फूल अतिशय दुर्मिळ आहे.