एक्स्प्लोर
VIDEO | रेसलिंग रिंगमध्येच प्रसिद्ध कुस्तीपटूचा मृत्यू, प्रेक्षकांचा शोचा भाग असल्याचा समज
51 वर्षीय कुस्तीपटू सिझर बॅरन उर्फ सिल्वर किंग याला रेसलिंग रिंगमध्येच हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाला

लंडन : सिल्वर किंग या नावाने प्रसिद्ध असलेल्या कुस्तीपटूचा रेसलिंग मॅचदरम्यान मृत्यू झाला. लंडनमध्ये सामना सुरु असताना रेसलिंग रिंगमध्येच हार्ट अटॅकमुळे त्याची अखेर झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सिल्वर किंग निपचित पडलेला असताना प्रेक्षकांना हा कार्यक्रमाचाच एक भाग वाटला.
51 वर्षीय कुस्तीपटू सिझर बॅरन हा सिल्वर किंग नावाने प्रसिद्ध आहे. शनिवारी संध्याकाळी तो लुशा लिब्र रेसलिंग शोमध्ये सहभागी झाला होता. 2005 मधील एका हॉलिवूडपटात साकारलेल्या खलनायिकाची व्यक्तिरेखा वठवत तो कुस्ती खेळत होता.
सामना सुरु असतानाच त्याला हृदयविकाराचा धक्का आल्याचं म्हटलं जात आहे. प्रेक्षकांना हा कार्यक्रमाचाच एक भाग असल्याचं वाटलं आणि काही काळ त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. परंतु काहीतरी गंभीर घडल्याची जाणीव होताच वैद्यकीय मदत बोलवण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी हा मृत्यू संशयित नसल्याचं म्हटलं आहे. मात्र सिल्वर किंगचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. जगभरातून रेसलिंग समित्यांनी सिल्वर किंगच्या निधनाबद्दल शोकसंदेश पाठवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
