Washington Firing : अमेरिकेत ज्यू संग्रहालयाबाहेर गोळीबार, इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; अमेरिकेचा टार्गेट किलिंगचा आरोप
Washington Firing : अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथील ज्यू संग्रहालयाबाहेर भीषण गोळीबार झाला असून, या गोळीबारात दोन इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Washington Firing : अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. मध्ये दोन इस्रायली नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. वॉशिंग्टन डी.सी. येथील ज्यू संग्रहालयाबाहेर भीषण गोळीबार झाला. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून, अटकेदरम्यान त्याने फिलिस्तीनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आहे. या घटनेवर इस्रायलने प्रतिक्रिया दिली असून, त्यांच्या माहितीनुसार या गोळीबारात इस्रायली दूतावासाच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
वॉशिंग्टन डी.सी. मध्ये भीषण गोळीबार झाला आहे. ही घटना रात्री सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. या हल्ल्यात एका पुरुष आणि एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, अशी माहिती समोर आली आहे. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले इस्रायली दुतावासामधील कर्मचारी होते.
संयुक्त राष्ट्रांतील इस्रायली राजदूत डॅनी डॅनन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. वॉशिंग्टन डी.सी. येथील यहूदी संग्रहालयाबाहेर झालेला जीवघेणा गोळीबार हा ज्यूविरोधी दहशतवादाचे विकृत रूप आहे. यहूदी समुदायावर हल्ला करणे म्हणजे एक लालरेषा ओलांडणे आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की अमेरिकन अधिकाऱ्यांकडून या गुन्हेगारी कृत्यामागील जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. इस्रायल आपले नागरिक आणि प्रतिनिधी यांचे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात संरक्षण करण्यासाठी ठामपणे कार्य करत राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
The fatal shooting that took place outside the event that took place at the Jewish Museum in Washington, D.C. is a depraved act of anti-Semitic terrorism. Harming the Jewish community is crossing a red line. We are confident that the US authorities will take strong action against… pic.twitter.com/mVyXHjGyxU
— Danny Danon 🇮🇱 דני דנון (@dannydanon) May 22, 2025
तर वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावासाच्या प्रवक्त्या ताल नैम यांनी म्हटलंय की, "वॉशिंग्टन डी.सी. येथील कॅपिटल ज्यूइश म्युझियममध्ये आयोजित एका यहूदी कार्यक्रमात सहभागी असलेल्या इस्रायली दूतावासाच्या दोन कर्मचारी सदस्यांवर जवळून गोळीबार करण्यात आला. स्थानिक तसेच फेडरल पातळीवरील कायदा अंमलबजावणी यंत्रणांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्या हल्लेखोराला लवकरात लवकर अटक करतील आणि अमेरिकेत इस्रायली प्रतिनिधी तसेच यहूदी समुदायांचे संरक्षण करतील," असे त्यांनी म्हटले आहे.
*Spokesperson at the Israeli embassy in Washington Tal Naim Cohen*:
— Tal Naim (@TalNaim_) May 22, 2025
Two staff members of the Israeli embassy were shot this evening at close range while attending a Jewish event at the Capital Jewish Museum in Washington DC.
We have full faith in law enforcement authorities on…
अमेरिकेचा टार्गेट किलिंगचा आरोप
दरम्यान, अमेरिकेच्या होमलॅंड सिक्युरिटी सचिव क्रिस्टी नोएम यांनी सांगितले की, ही घटना लक्ष्य ठरवून केलेल्या हत्येसारखी वाटते. सध्या या घटनेची तपास सुरू आहे आणि लवकरच यासंदर्भात अधिक माहिती शेअर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आणखी वाचा























