California blast : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात भीषण स्फोट, दहशतवादी हल्ल्याचा संशय; एकाचा मृत्यू, पाच जखमी
California Blast : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एका गर्भधारणा केंद्राच्या बाहेर बॉम्बस्फोट झाला असून, यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत.

California Blast : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एका गर्भधारणा केंद्राच्या बाहेर बॉम्बस्फोट झाला असून, यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) ने हा एक दहशतवादी हल्ला असल्याचे घोषित केले आहे. पाम स्प्रिंग्स शहराच्या डाउनटाउन भागात हा स्फोट झाला असून, त्यात क्लिनिकला गंभीर नुकसान झाले आहे आणि आसपासच्या इमारतींच्या खिडक्या व दरवाजे उडून गेले आहेत. हा स्फोट जाणूनबुजून घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या कारजवळ एक मृतदेह आढळून आला. ही कार अमेरिकन रिप्रोडक्टिव्ह सेंटर्सची असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे 11 वाजता नॉर्थ इंडियन कॅन्यन ड्राइव्ह आणि ईस्ट ताचेवाह ड्राइव्हच्या चौकात हा स्फोट झाला. हा दहशतवादी हल्ला जाणीवपूर्वक घडवून आणण्यात आला आहे, याबाबत कोणतीही शंका नाही. हा आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा प्रकार आहे की देशांतर्गत दहशतवादाचा, याचा तपास सध्या एफबीआयकडून सुरू आहे. पुढील चौकशीत या हल्ल्याचे स्वरूप स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
स्फोटात पाच जण जखमी
एफबीआयच्या लॉस एंजेलिस कार्यालयाचे प्रमुख अकील डेविस यांनी सांगितले की, या क्लिनिकला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी याला दहशतवादी हल्ला का ठरवले यामागचे कारण सांगण्यास त्यांनी नकार दिला. स्फोटात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही. मृत व्यक्तीच संशयित आहे का? हे डेविस यांनी हे स्पष्ट केले नाही. मात्र, त्यांनी सांगितले आहे की, इतर कोणत्याही संशयिताचा शोध घेतला जात नाही. डेविस यांनी माहिती दिली की, या स्फोटात पाच जण जखमी झाले आहेत.
स्फोट करणारा व्यक्तीच मृत असल्याची शक्यता
एका अधिकाऱ्याने 'अॅसोसिएटेड प्रेस'ला दिलेल्या माहितीनुसार, तपासकर्त्यांचा असा अंदाज आहे की मृत व्यक्ती कदाचित तोच होता ज्याने स्फोट घडवून आणला. मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केले की तपास अजून प्राथमिक टप्प्यात आहे. पाम स्प्रिंग्सचे पोलीस प्रमुख अँडी मिल्स यांनी हा 'जाणीवपूर्वक केलेला हिंसाचार' असल्याचे सांगितले. 'अमेरिकन रिप्रोडक्टिव्ह सेंटर्स' हे क्लिनिक डॉक्टरांनी पुष्टी केली की, त्यांचे क्लिनिक या स्फोटात नुकसानग्रस्त झाले आहे. सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा























