एक्स्प्लोर

Text Message : जगातल्या पहिल्या टेक्स्ट मेसेजचा लिलाव होणार; जाणून घ्या काय होता पहिला टेक्स्ट मेसेज...

World's First Ever Text Message : जगातल्या सर्वात पहिल्या टेक्स्ट मेसेजचा लिलाव येत्या 21 तारखेला करण्यात येणार आहे. 

मुंबई : सध्याच्या काळात व्हॉट्सअप मेसेंजिंगच्या माध्यमातून जग अतिशय जवळ आलं आहे. हे मेसेज म्हणजे आपल्या जीवनाचा नियमित भागच झालं आहे. त्या आधी फिचर फोनच्या माध्यमातून टेक्स्ट मेसेज करण्यात येत होते. पण तुम्हाला माहिती आहे का जगातला सर्वात पहिला मेसेज कोणी आणि कधी केला होता? आजपासून 30 वर्षांपूर्वी 1992 साली जगातला पहिला टेक्स्ट मेसेज करण्यात आला होता. आता या मेसेजचा लिलाव करण्यात येणार आहे. व्होडाफोनच्या वतीने हा लिलाव करण्यात येणार आहे. 

जगातला पहिला टेक्स्ट मेसेज हा व्होडाफोन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला होता. व्होडाफोनच्या कर्मचाऱ्याने 3 डिसेंबर 1992 रोजी हा टेक्स्ट मेसेज केला असून तो 'मेरी ख्रिस्मस' (Merry Christmas) असा होता. या मेसेजमध्ये 14 अक्षरे होती. नील पापवर्थ या कर्मचाऱ्याने न्यूबेरी बर्कशायरमधील रिचर्ड जार्व्हिसला हा पहिला मेसेज केला होता. व्होडाफोन कंपनीकडून शॉर्ट मेसेज सर्व्हिस म्हणजे एसएमएस सेवावर काम सुरु होतं. त्याचाच एक भाग म्हणून हा प्रयोग करण्यात आला होता. 

त्याच्याच पुढच्या वर्षी नोकीया कंपनीने एसएमएस फीचरची सुविधा उपलब्ध करुन दिली आणि त्यानंतरचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. 

आता या मेसेजचा लिलाव येत्या 21 डिसेंबरला फ्रान्समधील ऑगटर्स ऑक्शन हाऊस या ठिकाणी होणार आहे. यातून जे काही पैसे मिळतील ते संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स रिफ्युजी एजन्सी  (United Nations Refugee Agency- UNRA) ला देण्यात येणार आहेत. या मेसेजला लिलावासाठी 1 कोटी 71 लाख रुपयांची किमान मर्यादा ठेवण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला या मेसेजच्या सेंडर आणि रिसिव्हरची एक डिजिटल फाइल देण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump New Tariff Plan : डोनाल्ड ट्रंप पुन्हा फोडणार टॅरिफ बॉम्ब? भारत आणि चीनसह डझनभर देशांवर मोठं संकट; नेमकं प्रकरण काय?
डोनाल्ड ट्रंप पुन्हा फोडणार टॅरिफ बॉम्ब? भारत आणि चीनसह डझनभर देशांवर मोठं संकट; नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! धावत्या ट्रेनवर दरोडा, मालगाडीचे कुलूप तोडून चोर शिरले आत, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! धावत्या ट्रेनवर दरोडा, मालगाडीचे कुलूप तोडून चोर शिरले आत, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
CP On Mandar Kiwale Case: मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
Sharad Pawar Health: शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
Mumbai Mahim Firing Case: माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
Rajgurunagar Accident CCTV: राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
Embed widget