"...अन् त्यानं अंगावरचे सगळेच कपडे काढले"; टेकऑफ झाल्यावर प्रवाशी विवस्त्र, करावं लागलं इमर्जन्सी लँडिंग
Virgin Atlantic Flight: विमान आकाशात झेपावलं अन् पठ्ठ्या चक्रावला, कपडे काढू लागला आणि चक्क विवस्त्र झाला, त्यानंतर पुढे जे घडलं ते धास्ती भरवणारं होतं.
Flight Return After Naked Passenger Chaos: तांत्रिक बिघाडामुळे किंवा प्रवाशांमधील वादामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करावं लागल्याचं आपण सर्वांनीच अनेकदा ऐकलं आहे. पण व्हर्जिन ऑस्ट्रेलियाच्या पर्थ ते मेलबर्नच्या विमानात एक असा प्रकार घडला, जो खरंच अत्यंत धक्कादायक होता. VA696 या फ्लाईटमध्ये असलेला एक प्रवासी अचानक स्वतःचे कपडे काढू लागला आणि पूर्णपणे नग्न झाला. तो विमानात इकडे तिकडे धावू लागला. विमानातील सर्व प्रवासी त्याचं कृत्य भावून सर्वात आधी तर धास्तावले. कोणाला काहीच कळत नव्हतं. बरं हा पठ्ठ्या एवढ्यावरच थांबला नाही. तो सारखा जाऊन कॉकपिटचा दरवाजाही ठोकू लागला आणि गोंधळ घालता घातला त्यानं एका फ्लाईट अटेंडंटलाही खाली पाडलं. दरम्यान, या प्रवाशाची ओळख सध्या उघड झालेली नाही.
VA696 विमानानं टेकऑफ केलं आणि सर्व प्रवाशांनी सीटबेल्ट काढून स्थिरस्थावर झाले. पण तेवढ्या कोणी कधीच विचार केला नसेल, अशी घटना घडली. एक प्रवासी उठला आणि त्यानं स्वतःचे कपडे काढायला सुरुवात केली. त्यानं आपल्या अंगावरचे सर्व कपडे काढले आणि पूर्णपणे नग्न झाला. त्यानंतर हा विमानात इकडून तिकडे धावू लागला. मध्येच कॉकपीटचा दरवाजा ठोठवायचा आणि त्यानंतर पुन्हा इकडून तिकडे पळायचा. यानं सर्वांना अगदी हैराण करून सोडलं होतं. या प्रवाशामुळे विमानाचं इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आलं होतं.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, पर्थमध्ये विमान लँड झाल्यानंतर त्या व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली. एका प्रवाशानं ऑस्ट्रेलियन रेडिओ स्टेशन 3AW ला सांगितलं की, प्रवाशानं अचानक विचित्र वागणं सुरू केलं, त्यामुळे सर्व प्रवाशी गोंधळले असून धास्तावले आहेत. व्हर्जिन ऑस्ट्रेलियानं या घटनेची आणि त्या व्यक्तीच्या अटकेची पुष्टी केली आहे. या कालावधीत संयम आणि सहकार्याबद्दल विमान कंपनीनं प्रवासी आणि क्रू यांचे आभार मानले आहेत.
पती-पत्नीमध्ये एवढी मारामारी झाली की विमान उतरवावे लागले
गेल्या वर्षी म्युनिकहून बँकॉकला जाणाऱ्या लुफ्थांसा एअरलाइन्सच्या विमानाचं दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. दरम्यान, फ्लाईटमध्ये पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणामुळे केबिन क्रू स्टाफला हा निर्णय घ्यावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, म्युनिकहून उड्डाण घेतल्यानंतर फ्लाईट LH772 मध्ये बसलेले पती-पत्नी काही मुद्द्यांवरून आपापसांत वाद घालू लागले. दोघांमधील वाद इतका वाढला की, फ्लाईटमध्येच सर्व प्रवाशांसमोर दोघांमध्ये भांडण सुरू झालं. केबिन क्रूनं त्यांना भांडताना पाहिल्यानंतर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण जोडपं थांबलं नाही. उलट दोघांमधील भांडण आणखी वाढलं. त्यानंतर केबिन क्रूनं फ्लाईट कॅप्टनला याची माहिती दिली. बराच वेळ होऊनही वाद शमला नाही, तेव्हा इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. सर्वात आधी विमान कर्मचाऱ्यांनी पाकिस्तान एटीसीशी संपर्क साधून आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. मात्र, त्यांना परवानगी न मिळाल्यामुळे दिल्लीत या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.