एक्स्प्लोर

Video : आईला भेटायला हत्तीच्या पिल्लाची लगबग; वनाधिकाऱ्यांनी वाचवले प्राण

Thailand News : हत्ती आणि तिचे एक वर्षाचे  पिलू खड्ड्यात पडल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या वन्यप्राणी विशेष तज्ज्ञांच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.

Thailand Elephant Rescue: थायलंडच्या याई नॅशनल पार्कमध्ये  एक हत्तीचं पिलू खड्ड्यात पडलं, त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात त्याची आई देखील खड्ड्यात पडली. खड्ड्यात मोठ्या प्रमाणात चिकट गाळ होता, तेव्हा या हत्तीच्या पिलूला बाहेर काढणं एक आव्हान ठरलं, अखेर या खड्ड्याच्या बाजूला जेसीबी कंपनीच्या मशीनने मोठा खड्डा खणण्यात आला. यातून या पिलाला बाहेर काढण्यात तब्बल सात तासानंतर बचाव पथकाला यश आले.

हत्ती आणि तिचे एक वर्षाचे  पिलू खड्ड्यात पडल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या वन्यप्राणी विशेष तज्ज्ञांच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मुसळधार पावसात देखील बचाव कार्य सुरू होते. बचाव पथकाने दोन हत्तींना खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी त्या खड्ड्याच्या शेजारी एक मॅनहोल तयार केले आणि एक किमी लांबीचा रस्ता बनवला. ज्यामुळे या गाळातून हत्तीला सहज बाहेर पडता येईल.

रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी पशु चिकित्सक डॉ. चाण्या कंचनसारक म्हणाल्या, हत्तीची आई जवळ असल्याने बचाव पथकाला पिलाजव जाणे कठीण होते. त्यामुळे आईला बेशुद्ध करण्यासाठी ट्रॅक्विलायझरचे तीन डोस दिले. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर दोघांना बाहेर काढण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले.

 बचावपथकाच्या सात तासाच्या प्रयत्नानंतर दोघांनी सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. बचावपथकातील कर्मचाऱ्यांनी ट्रकवर चढून लाकडांच्या मदतीने आईला खड्ड्यातून बाहेर काढले. खड्ड्यातून बाहेर येताच भुकेने व्याकूळ झालेले पिलू आईचे दूध प्यायले. त्यानंतर हत्ती आणि तिच्या पिलाला जंगलात सोडण्यात आले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget