World's Most Expensive French Fries : मॅकडॉनल्स नाही, बर्गर किंग नाही... 'या' ठिकाणी मिळतात जगातील सर्वात महाग 'फ्रेंच फ्राइज', किंमत तर ऐका
जगातील सर्वात महाग फ्राइजची किंमत किती असेल? असा विचार तुम्ही कधी केला आहे का?
![World's Most Expensive French Fries : मॅकडॉनल्स नाही, बर्गर किंग नाही... 'या' ठिकाणी मिळतात जगातील सर्वात महाग 'फ्रेंच फ्राइज', किंमत तर ऐका national french fries day world most expensive french fries in new york cafe World's Most Expensive French Fries : मॅकडॉनल्स नाही, बर्गर किंग नाही... 'या' ठिकाणी मिळतात जगातील सर्वात महाग 'फ्रेंच फ्राइज', किंमत तर ऐका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/818b7310d6ea69936b4eb309d9ff068c1657617548_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
World's Most Expensive French Fries : बटाट्यापासून तयार केलेले फ्रेंच फ्राइज खायला अनेकांना आवडतात. चिज फ्राइज, पेरी पेरी फ्राइज असे बऱ्याच प्रकारचे फ्राइज असतात. बर्गर, सँडविच आणि पिझ्झासोबत लोक फ्राइज खातात. फ्रेंच फ्राइजसोबत लोक सॉस देखील खातात. जगातील सर्वात महाग फ्राइजची किंमत किती असेल? असा विचार तुम्ही कधी केला आहे का? उद्या (13 जुलै) राष्ट्रीय फ्रेंच फ्राइज दिवस (National French Fries Day) आहे. यानिमित्त जाणून घेऊयात जगातील महाग फ्राइजबाबत...
न्यूयॉर्कमधील एका हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राइजच्या एका प्लेटची किंमत ही 200 डॉलर आहे. म्हणजेच जवळपास 15 हजार रुपयांना फ्रेंच फ्राइजची एक प्लेट या हॉटेलमध्ये देण्यात येते. गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये या फ्रेंच फ्राइजची नोंद ही जगातील सर्वात महाग फ्रेंच फ्राइज अशी करण्यात आली आहे.
काय आहे खास?
हे फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी महागड्या आणि उच्च दर्जाच्या बटाट्यांचा वापर करण्यात येतो, हे या डिशचं वैशिष्ट्य आहे. यात व्हिंटेज 2006 शॅम्पेन, जेले ले ब्लँक फ्रेंच शॅम्पेन व्हिनेगर, ट्रफल सॉल्ट, ट्रफल ऑइल, स्पेशॅलिटी चीज, बटर यांचा वापर हे फ्रेंच फ्राइज तयार करताना केला जातो. तसेच 23 कॅरेट एडिबल गोल्ड डस्टिंग देखील यावर केले जाते. या जगातील सर्वात महागड्या फ्रेंच फ्राईजचे नाव 'Crème dela Crème Pommes Frites' आहे. 2021 मध्ये, हे जगातील सर्वात महाग फ्रेंच फ्राइज म्हणून घोषित करण्यात आले होते. हे फ्रेंच फ्राइज विकणाऱ्या न्यूयॉर्कमधील हॉटेलमध्ये जगातील सर्वात महाग सँडविच देखील विकले जाते. तसेच या हॉटेलमध्ये जगातील सर्वात महाग डेजर्ट देखील मिळते. या डेजर्टची किंमत 19 लाख रुपये आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)