Viral News: प्रेयसीने गोंदवला प्रियकराच्या नावाचा टॅटू, आठवड्यानंतर तरूणीसोबत काय घडलं? तुम्हीच बघा...
Viral News: ग्रेसचं व्यथा ऐकल्यानंतर अनेकांनी तिला दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. तर,काही जणांनी पहिल्यांदाच एवढा मोठा टॅटू पाहिल्याचे म्हटलंय.
Viral News: तरूणामध्ये नेहमीच नवनवीन ट्रेन्ड व्हायरल होत असतात. तरूण मंडळी नेहमीच नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी उत्सुक असतात. सध्या तरूणांमध्ये टॅटू (Tattoo) काढण्याचा ट्रेन्ड अधिक पाहायला मिळतोय. अनेकांना त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू डिझाइन करायला आवडतात. तसेच काहीजण आपल्या जवळच्या वक्तीच्या नावाचा टॅटू शरिरावर गोंदवून घेतल्याचे आपण पाहिलंय. मात्र, एका तरूणीला तिच्या प्रियकराच्या नावाचा टॅटू गोंदवून घेणं चांगलच महागात पडलंय.
अॅश्लिन ग्रेस असं त्या तरूणीचे नाव आहे. ग्रेसनं टिक-टॉकच्या माध्यमातून महत्वाची गोष्ट लोकांसोबत शेअर केलीय. ग्रसनं काही दिवसांपूर्वी पाठीवर तिच्या प्रियकराचे नाव गोंदवलं होंत. तिनं हा टॅटू सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दाखवला होता. मात्र, त्यानंतर तिच्यासोबत जे घडले, याची कल्पनाही ग्रेसला नव्हती. टॅटू बनवल्यानंतर आठवडाभरातच तिचा ब्रेकअप झाला. ज्यामुळे ती अडचणीत आली. आता काय करावे? अशा प्रश्न तिला पडलाय.
पाठीवर गोंदवला मोठा टॅटू-
अॅश्लिन ग्रेसनं तिच्या प्रियकराचं नाव मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. अलेक्झांडर असं तिच्या प्रियकराचे नाव होतं. एवढं मोठं नाव गोंदावून घेताना ग्रेसला खूप वेदना सहन कराव्या लागल्या होत्या. ग्रेसनं सोशल मीडियावर तिची व्यथा मांडली. एवढा मोठा टॅटू बनवल्याबद्दल तिला खूप वाईट वाटतंय. कारण, हा टॅटू बनवल्यानंतर एका आठवड्याच तिचा ब्रेकअप झालाय.
युजर्स देतायेत अशा प्रतिक्रिया-
ग्रेसचं व्यथा ऐकल्यानंतर अनेकांनी तिला दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. तर,काही जणांनी पहिल्यांदाच एवढा मोठा टॅटू पाहिल्याचे म्हटलंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या व्हिडिओला 50 लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आलाय.
हे देखील वाचा-