एक्स्प्लोर
Gold coated hotel | जगातील पहिलं वहिलं सोन्याचं हॉटेल; लॉकडाऊनच्या काळातही पर्यटकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
जगातील पहिलं वहिलं सोन्याचं हॉटेल व्हिएतनामची राजधानी हनोईही या ठिकाणी उघडण्यात आलं आहे. हॉटेल उघडल्यानंतर पर्यटकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हनोईही : तुम्ही आतापर्यंत अनेक गोल्ड मॅन, सोन्याच्या दुचाकी, चारचाकी पाहिल्या असतील. आपल्या देशात तर सोन्याची अनेक मंदिरंही आहे. मात्र, आता चक्क सोन्याच्या हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. हे जगातील पहिलं सोन्याचं हॉटेल मानले जात आहे. व्हिएतनामची राजधानी हनोईही या ठिकाणी हे सोन्याचं हॉटेल आहे.
दोन जुलै म्हणजेच गुरुवारी या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी ग्राहकांनी या हॉटेलमध्ये राहण्यासाठी गर्दी केली होती. या हॉटेलच्या भिंती आणि शॉवरही गोल्ड प्लेटेड आहेत. जगातील पहिले सोन्याचे हॉटेल व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये खुले झाले आहे. येथे दरवाजे, कप, टेबल, खिडक्या, नळ, वॉशरुम, भांडी आदी सारेच सोन्याचे आहे.
वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी बेस्ट Pre-Paid रिचार्ज प्लान्स!
या हॉटेलचे नाव डोल्से हनोई गोल्डन लेक (Dolce Hanoi Golden Lake) असे आहे. या हॉटेलचे गेट ते कॉफीच्या कपापर्यंत सर्व वस्तू सोन्याच्या बनविण्यात आल्या आहेत. हे एक पंचतारांकित हॉटेल असून 25 मजल्याचे आहे. या हॉटेलमध्ये 400 खोल्या आहेत. हॉटेलच्या बाहेरील भिंतींवर जवळपास 54 हजार वर्ग फुटांच्या गोल्ड प्लेटेड टाईल्स लावण्यात आल्या आहेत.
पर्यटकांची गर्दी
सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे जवळपास संपूर्ण जगात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, व्हिएतनाममध्ये लॉकडाऊनची शिथीलता देण्यात आली आहे. सोबतचं अनेक दिवसांपासून घरातच राहवे लागल्यामुळे पर्यटकही फिरण्याचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडत आहे. यातच सोन्याचं हॉटेलमध्ये पर्यटन करण्यास मिळणे म्हणजे दुधात साखर असल्यासारखं असल्याचं पर्यटकांचं म्हणणं आहे. जगातील हे पहिलेचं सोन्याचं हॉटेल असल्याने पर्यटकांनी हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
Sheshnag Train | इतिहासात पहिल्यांदाच धावली तब्बल 2.8 किलोमीटर लांबीची 'शेषनाग' ट्रेन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement