Firing in New York : न्यूयॉर्कमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 जणांचा मृत्यू
New York Firing : बफेलो येथील सूपरमार्केटमध्ये शनिवारी दुपारी अंधाधूद गोळीबार करण्यात आला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

New York Firing : न्यूयॉर्कमध्ये बफेलो येथील सूपर मार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 'टॉप्स फ्रेंडली' सूपरमार्केटमध्ये झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. गव्हर्नर कॅथी होचुल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, बफेलो येथील किराणा दुकानातील घटनेबाबत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून पुढील तपास आहे.
बफेलो येथील पोलीस आयुक्त जोसेफ ग्रामाग्लिया यांनी सांगितले की, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्यानं हेल्मेट घातलं होतं. पोलिसांनी गोळीबारात 10 जणांचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाल्याचं सांगितलं आहे.
BREAKING: The death toll has risen to 10 in a mass shooting at a Buffalo, N.Y., supermarket, law enforcement officials told The Associated Press. https://t.co/N08wAwjwNc
— The Associated Press (@AP) May 14, 2022
मार्केटमध्ये एक निवृत्त पोलीस अधिकारी सेक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी घटनेबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने निवृत्त पोलीस अधिकारी असलेल्या सेक्युरिटी गार्डच्या मानेवर बंदुक धरली होती. मात्र, पोलिसांनी आणि त्याच्यामध्ये झालेल्या संभाषणानंतर आरोपीनं आत्मसमर्पण केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
गोळाबाराचा व्हिडीओ समोर
एफबीआयच्या पथकाकडून संशयिताची चौकशी सुरु आहे. पोलीस आणि तपास पथकाला संशय आहे की गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या हेल्मेटवर बसवलेल्या कॅमेऱ्याद्वारे संपूर्ण घटना लाइव्ह-स्ट्रीम केली आहे. सध्या गोळीबाराच्या समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये आरोपी पार्किंगमध्ये कारच्या पुढच्या सीटवर रायफल धरुन बसलेला दिसत आहे. गाडीतून उतरताच त्याने लोकांवर गोळीबार सुरू केला. व्हिडीओमध्ये आरोपी सुपरमार्केटमध्ये शिरताना दिसत आहे. आरोपी मार्केटमध्ये आत शिरताच अनेक लोकांना अंदाधूंद गोळीबार करण्यास सुरुवात करतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- न्यूयॉर्क हादरलं! ब्रुकलिन सबवे स्टेशनमध्ये अंदाधुंद गोळीबार अन् स्फोट, अंगावर शहारा आणणारे फोटो
- NASA : मंगळ ग्रहावर दिसला एलियनच्या घराचा दरवाजा? नासाच्या नव्या फोटोंचं गूढ काय?
- श्रीलंकेत सफरचंद 1200, तर द्राक्षे 1800 रुपये; सामान्य नागरिकांच्या अडचणी संपेना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
