एक्स्प्लोर

अमेरिका भारतासोबत, दहशतवाद्यांवर आधी कारवाई करा, पाकिस्तानला झापले

भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली. संरक्षणसंदर्भातील सहकार्य आणि या भागातील शांतता कायम रहावी, यासंदर्भात चर्चा केल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांच्याशी देखील पोम्पिओ यांनी चर्चा केली.

नवी दिल्ली  : भारताच्या हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे 350 दहशतवादी मारले गेले.  कारवाईनंतर पाकिस्तानने पुन्हा भारताला इशारा दिला आहे. जगभरातून यावर प्रतिक्रिया येत असून अनेक देशांनी पाकिस्तानला दहशतवाद संपविण्याचे आवाहन केले आहे. आता अमेरिकेनेही पाकिस्तानला झापले असून लष्करी कारवाई करायची असेल तर आधी देशातील दहशतवाद्यांवर करा, असा सल्ला पाकिस्तानला दिला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने देखील भारताला सोबतीची खात्री दिली आहे. अमेरिकेनं भारताला समजूत देण्याआधी पाकिस्तानलाच दहशतवादी संघटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. आणि पाकिस्ताननं त्यांच्या भूमीवर दहशतवाद्यांना आश्रय देणं थांबवावं, असंही स्पष्ट केलंय. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या बालाकाटमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक केला. यानंतर अमेरिकेने या विषयी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमधील या ऑपरेशनसाठी भारताला अमेरिकेची साथ मिळाली असून अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद संपवण्याच्या सल्ला दिला आहे. अमेरिका भारतासोबत, दहशतवाद्यांवर आधी कारवाई करा, पाकिस्तानला झापले दोन्ही देशांमधील तणाव कमी करणे गरजेचे असल्याने भारताविरोधात लष्करी कारवाई टाळावी आणि दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, असे अमेरिकेने पाकला सुनावले आहे. सध्या भारत – पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करुन याबाबतची माहिती दिली. VIDEO | भारताने कशी रचली 'एअर स्ट्राईक'ची स्ट्रॅटर्जी | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली. संरक्षणसंदर्भातील सहकार्य आणि या भागातील शांतता कायम रहावी, यासंदर्भात चर्चा केल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांच्याशी देखील पोम्पिओ यांनी चर्चा केली. तणाव कमी करण्यासाठी लष्करी कारवाई टाळावी आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई करावी, असे त्यांनी पाकला सांगितले. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी लष्करी कारवाई टाळून थेट चर्चा करावी, असे देखील अमेरिकेने म्हटले आहे. भारताच्या हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे 350 दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीनंतर इम्रान खान यांनी भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर देणार, असे सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget