Nikki Haley: अमेरिकेचा पुढचा अध्यक्ष भारतीय वंशाचा? निक्की हॅलेंची निवडणूक लढवण्याची घोषणा
US Presidential Election 2024: भारतीय वंशाच्या रिपब्लिकन नेत्या निक्की हॅले आता डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणार असून तशी घोषणा त्यांनी केली आहे.
US Presidential Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची 2024 साली होणारी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भारतीय वंशाच्या रिपब्लिकन नेत्या निक्की हॅली (Nikki Haley) यांनी केली आहे. त्यासाठी आज त्यांनी आपली दावेदारी घोषित केली. निक्की हॅली या दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर आणि संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या माजी राजदूत राहिल्या आहेत. अमेरिकेत 5 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे
निक्की हॅली यांनी 2024 ची अध्यक्षीय निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे ते डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठं आव्हान असेल. आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात निवडणूक लढवणार नाही असं निक्की हॅली यांनी दोन वर्षापूर्वी सांगितलं होतं. आता त्यांनी आपण निवडणूक लढवत असल्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच 2024 सालची अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचा दावा त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मांडला.
दोन वर्षांपूर्वी निक्की हॅली या ट्रम्प यांच्यासाठी आव्हान नव्हत्या, पण आता त्यांनी आपला विचार बदलल्याचं दिसतंय. भारतीय वंशाच्या अमेरिकन रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निक्की हॅली यांनी गेल्या महिन्यातच ज्यो बायडेन यांच्या विरोधात 2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. निक्की हॅले या मूळच्या भारतीय वंशाच्या असून त्यांचे मूळ पंजाबमधील अमृतसर येथे आहे.
जानेवारीमध्ये फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत, अमेरिकन रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निक्की हॅली यांना विचारण्यात आले होते की त्या 2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे का? तर त्यांनी उत्तर दिलं होतं की, नवीन पिढीसाठी, नवीन नेतृत्वाची वेळ आली आहे. आपला देशाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याची वेळ आली आहे. अमेरिका लढायला तयार आहे आणि आम्ही आता सुरुवात करत आहोत.
रिपब्लिकन पक्षाला तरुण नेतृत्वाची गरज
निक्की हॅली यांनी एप्रिल 2021 मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं की, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 2024 च्या व्हाईट हाऊस निवडणुकीच्या शर्यतीत असताना त्या लढणार नाहीत. परंतु या वर्षाच्या जानेवारीमध्ये त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की रिपब्लिकन पक्षालाही तरुण नेतृत्वाची गरज आहे.
अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या पात्रतेचे नाहीत असं निक्की हॅले म्हणाल्या होत्या. आपण नेतृत्व करु शकतो आणि जिंकू शकतो असा विश्वास रिपब्लिकनना देण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.
ही बातमी वाचा :