(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित, आगामी कार्यक्रम रद्द
Joe Biden : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बाइडन यांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
Joe Biden Corona Positive : अमेरिकी (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांना पुन्हा एकदा कोरोना संसर्ग (Corona Infected) झाला आहे. व्हाइट हाऊसचे (White House) डॉ. केविन ओ'कॉनर यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, बायडन यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणं जाणवत नाहीत. बायडन नुकतेच कोरोना संसर्गातून बरे झाले होते.
व्हाइट हाऊसचे (White House) डॉ. केविन ओ'कॉनर यांनी अधिकृत घोषणा करत सांगितलं आहे की, अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांना सध्या विलगीकरणात (Isolation) ठेवण्याच आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या बायडन यांना किमान पाच दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यातच बायडन यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.
21 जुलै रोजी झाली होती कोरोनाची लागण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना 21 जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्यामध्ये संसर्गाची काही लक्षणंही दिसून आली. या आठवड्यात त्यांचा कोरोना संसर्गाचा अहवाल मंगळवारी संध्याकाळी, बुधवारी सकाळी, गुरुवारी सकाळी आणि शुक्रवारी सकाळी निगेटिव्ह आला. पण त्यानंतर शनिवारी बायडेन यांचा कोरोनाचा अँटीजेन रिपोर्ट पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आला आहे.
आगामी कार्यक्रम रद्द
कोरोनाची लागण झाल्यानंतरही जो बायडेन (अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन) व्हाईट हाऊसमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या बैठकांमध्ये भाग घेत आहेत. व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे की, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. बायडन यांचा रविवारी सकाळी विल्मिंग्टन येथील त्यांच्या घरी जाण्याचा आणि मंगळवारी मिशिगनला जाण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.