Ukraine Russia War : युक्रेनवरील हल्ल्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर टीका केली आहे. रशियावरील निर्बंध सतत सुरूच राहतील, असे बायडन यांनी म्हटले आहे. याबरोबरच युक्रेनवरील अन्यायकारक हल्ल्यासाठी रशियाला भविष्यातही दोषी धरण्यात येईल. शिवाय या हल्ल्याची जागतिक स्तरावर रशियाला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा जो बायडन यांनी दिला आहे. 


रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्यापही सुरूच आहे. यातच जो बायडन यांनी रशियाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे अत्यंत आक्रमक असून त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल, असे जो बायडन यांनी म्हटले आहे.


रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे अमेरिकेने रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. रशियाकडून घेण्यात येणाऱ्या तेल, वायू आणि ऊर्जा आयातीवर अमेरिकेकडून पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याबरोबरच रशियासोबत व्यापार केला जाणार नसून रशियन उद्योगपती आणि बँकांवर निर्बंध लादण्याबाबतही बायडन यांनी माहिती दिली आहे. 'आम्ही रशियावर निर्बंध लादत आहोत. आम्हालाही त्याची किंमत चुकवावी लागणार आहे. परंतु, युक्रेनवरील हल्ल्यानंतर आम्ही रशियावर असे निर्बंध लादत राहू." असे जो बायडन यांनी म्हटले आहे. 


अमेरिकेप्रमाणे जगातील अनेक देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे रशियन कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबरोबरच या निर्बंधांची रशियन खेळाडू आणि इतर लोकही किंमत मोजत आहेत. 


दरम्यान, गेल्या 15 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांतील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. परंतु, अजूनही दोन्ही देश माघार घेण्याच्या स्थितीत नाहीत. 


महत्वाच्या बातम्या