Ukraine-Russia War: रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज 12 दिवस असून आता या युद्धाचा फटका युक्रेनसह जगभराला बसताना दिसत आहे. याच दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात 35 मिनिटे फोनवर चर्चा झाली आहे. या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनची परिस्थिती जाणून घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या थेट चर्चेचेही पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे. यासोबतच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी तेथील सरकारने केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांचे आभार मानले आहेत. तसेच युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अशीच मदत करत राहण्यास सांगितलं आहे.

  


रशिया आणि युक्रेन आज तिसर्‍या फेरीसाठी समोरासमोर बसणार 


रशिया-युक्रेनमध्ये आत्तापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. या दोन्ही देशांमधील हा वाढता तणाव पाहता आता इस्रायल, फ्रान्स आणि तुर्कस्तान शांततेसाठी समझोता करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान रशिया आणि युक्रेन आज तिसर्‍या फेरीसाठी समोरासमोर बसणार आहेत. याआधी झालेल्या चर्चेच्या दोन फेऱ्यांमधून काहीही निष्पन्न झाले नाही.





खार्किवमध्ये 8 जणांचा मृत्यू 


या दोन्ही देशांमध्ये चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असला रशियाने युक्रेनवर बॉम्बहल्ले सुरूच ठेवले आहेत. अशातच आज रशियाने युक्रेनमधील खार्किव शहरात जोरदार बॉम्बहल्ला केला आहे. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रशियाच्या मायकोलायव शहरातही रॉकेटचा स्फोट झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशीही फोनवरून चर्चा करणार आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :