Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या या युद्धामुळे झालेला विध्वंस स्पष्टपणे दिसत आहे. रशिया-युक्रेनमधून लोक जीव मुठीत घेऊन पलायन करत आहेत, लोकांना घरे सोडण्यास भाग पाडले जात आहे. एकीकडे लोक विनाशापासून दूर पळत आहेत, तर दुसरीकडे दोन अमेरिकन अंतराळ शास्त्रज्ञ मॉस्कोमध्ये एका कॅप्सूलमध्ये बंद आहेत. त्यांना या युद्धाची कोणतीही माहिती नसल्याचे बोलले जात आहे. खरंतर, हे शास्त्रज्ञ नासाच्या 8 महिन्यांच्या अंतराळ प्रयोगात सहभागी आहेत.


जुलैपर्यंत राहणार कॅप्सूलमध्येच बंद


अमेरिकन नागरिक लवकरात लवकर रशिया सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या शास्त्रज्ञांना याबद्दल काहीही माहित नाही. बंद कॅप्सूलमध्ये ते त्यांचे काम करत आहेत. नासा SIRIUS 21 नावाचा एक प्रयोग करत आहे. या प्रयोगात सहभागी असलेल्या 6 लोकांना एका कॅप्सूलमध्ये बंद केले आहे. त्यापैकी दोन अमेरिकन, 3 रशियन नागरिक आणि अमिरातीचे नागरिक या कॅप्सूलमध्ये बंद आहेत. नासाच्या या मोहिमेसाठी हे शास्त्रज्ञ कॅप्सूलमध्ये गेले होते, ते जुलैपर्यंत तिथेच राहतील.


कॅप्सुलबाहेर अशा प्रकारे करू शकतात संपर्क


बाहेरील जगाशी ते केवळ इलेक्ट्रॉनिक पत्राद्वारे संवाद साधू शकतात. ही इलेक्ट्रॉनिक अक्षरे प्रयोगात सहभागी असलेल्या समन्वयकाद्वारे सुरक्षित सर्व्हरवर अपलोड केली जातात. कॅप्सुलबाहेर राहणाऱ्या एका सहकाऱ्याने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, या युद्धापूर्वीही त्या कॅप्सूलमध्ये शास्त्रज्ञांशी चर्चा झाली होती. पण बाहेर या युद्धाची त्याला जाणीव आहे की नाही, याबाबत साथीदारनांही ठोस माहिती नाही. तर, नासाने याप्रकरणी कोणतीही माहिती दिलेली नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha