Russia Ukraine War : रशिया-युक्रेनचा तणाव काही कमी होत नाही. युक्रेन- रशिया युद्धाचा परिणाम हा सर्वात जास्त रशिया आणि युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवर झाला आहे.  रशियातील भारतीय दूतावासाला  विद्यार्थ्यांकडून देशात राहण्याबाबत सतत सल्ला मागणारे संदेश प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर रशियात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक नियमावली जाहीर केली आहे.


काय आहे  नियमावली?


1. दूतावासाने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी सुरक्षतेच्या कारणावरून रशिया सोडण्याचे कोणतेही कारण  नाही. रशियातील दूतावास  भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी नियमित संपर्कात  आहे. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.


2.  रशियामधील बँकिंग सेवांमध्ये काही व्यत्यय  येत  आहे. मात्र  रशिया ते भारत थेट विमान कनेक्टिव्हिटी सध्या उपलब्ध  आहे. विद्यार्थ्यांना भीती वाटत असेल  आणि त्यांना भारतात परत जायचे असेल तर ते पर्यायाचा विचार  करू शकतात.


3.  भारतात परतताना विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाबद्दल  दूतावासाने विद्यापीठांशी चर्चा केली आहे. सध्या सर्व शिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहे.   विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये अडचण येऊ नये  यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित विद्यापीठांशी चर्चा  करावी. विद्यार्थ्यांनी सतत आपल्या विद्यापीठांच्या संपर्कात राहावे






 


तर दुसरीकडे दिल्ली, कीव्ह, मॉस्को येथे अडकलेल्या भारतीया विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी 24 तास प्रयत्न केले जात आहे.  युक्रेनच्या उत्तर पूर्व भागात अडकलेल्या 600 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रशिया-युक्रेनचा तणाव काही कमी होत नाही.. युक्रेनमधील लुत्स्क आणि इवानो फ्रांकिविस्क शहर आता रशियाच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान, निप्रो शहरात रशियाकडून मोठा बॉम्ब हल्ला करण्यात आला. यात शहराचं मोठं नुकसान झालं.


संबंधित बातम्या :



Russia Ukraine War : रशियन हल्ल्याविरोधात फेसबुकने आपलाच नियम केला शिथील, रशियाविरोधात हिंसक भाषेला परवानगी