Ukraine Russia War : युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारतीय दूतावासाने योजना आखली आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे की, सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पोल्टावामार्गे पश्चिम सीमेवर सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी पोल्टावा शहरातील भारतीय दूतावासाची टीम तैनात आहे. योजना राबवण्याची वेळ आणि तारीख लवकरच प्रसिद्ध केली जाईल. दूतावासाने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना अल्प सूचनेवर सुमी सोडण्यास तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.


कठीण परिस्थितीत विद्यार्थी
युक्रेनमधील युद्धग्रस्त सुमी येथे अडकलेले शेकडो भारतीय विद्यार्थी युद्धभूमीतून सुटकेसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. तेथे विद्यार्थी अतिशय कठीण परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांना तहान भागवण्यासाठी बर्फ वितळण्यावर अवलंबून राहावे लागत आहे तर अन्नाचा पुरवठाही झपाट्याने संपत चालला आहे.






 


दरम्यान विद्यार्थ्यांची प्रतीक्षा दीर्घकाळ वाढली, कारण हल्ल्यामुळे रशियन सीमेवर सुरक्षित मार्गावर अडथळा निर्माण झाला आहे. भारत सरकारने विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आता दारुगोळा आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांदरम्यान पायी रशियन सीमेपर्यंतचा खडतर प्रवास करण्याचा विचार सोडून दिला आहे. 25 वर्षीय जिस्ना जीजी या वैद्यकीय विद्यार्थिनीने सांगितले की, 'रशियन सीमेवर चालणे धोक्याचे असल्यामुळे धीराने वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.'


हताश विद्यार्थ्यांनी शनिवारी जारी केला होता व्हिडिओ
सुमीमधील हताश विद्यार्थ्यांनी शनिवारी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांनी गोठवणाऱ्या थंडीत लढताना रशियन सीमेवर जाण्याचा धोका पत्करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता निर्माण झाली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच, भारत सरकारने विद्यार्थ्यांना आश्रयस्थानांमध्ये राहण्यास सांगितले आणि त्यांना लवकरच बाहेर काढले जाईल असे आश्वासन दिले.


युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी, भारत सरकारने 'ऑपरेशन गंगा' सुरू केले आहे, ज्या अंतर्गत पश्चिम युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या देशांमधून अडकलेल्या हजारो लोकांना बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, युक्रेनच्या पूर्वेकडील भागातून नागरिकांना बाहेर काढणे हे एक आव्हान आहे.


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha