US Plane Hijack : पायलटकडून विमानाचं अपहरण करत वॉलमार्ट उडवण्याची धमकी, अखेर विमानाचं सुरक्षित लँडींग, हायजॅक करणारा पायलट अटकेत
US Hijacked Plane : अमेरिकेत तुपोलो विमानतळावर एका वैमानिकाने नऊ आसनी विमान हायजॅक केलं होतं. त्या विमानानं सुरक्षित लँडींग झालं असून पायलटला अटक करण्यात आली आहे.
US Hijacked Plane Landed Safely : अमेरिकेच्या (America) मिसिसिपी (Mississippi) येथे एका वैमानिकानं विमानाचं अपहरण करत अपघाताची धमकी दिली होती. हे विमान आता सुरक्षित लँड झालं असून विमान हायजॅक करणाऱ्या पायलटला पोलिसांनी अटक केली आहे. तुपोलो विमानतळावर एका वैमानिकाने नऊ आसनी विमान हायजॅक केलं होतं. या विमानाचा अपघाताची धमकी दिल्याने मोठी खळबळ माजली होती. वैमानिकानं अपहरण केलेलं हे विमान आकाशात बराच वेळ घिरट्या घालत होतं. मात्र आता या विमानानं सुरक्षित लँडींग झालं असून पायलटला अटक करण्यात आली आहे.
अनेक तासांच्या गोंधळानंतर आता गव्हर्नर टेट रीव्हस यांनी दिलासा देणारी बातमी दिली आहे. विमानानं अॅशलँडच्या नैऋत्य-पश्चिमेला एका शेतात सुरक्षित लँडिंग केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. विमान पूर्णपणे सुरक्षित आहे. पायलटने नऊ आसनी विमानाचं अपहरण करून तुपेलो विमानतळावरून उड्डाण घेतलं. यानंतर अनेक तास ते विमान शहरावरच आकाशात उड्डाण करत होतं. पायलटनं विमान क्रॅश करण्याची धमकी दिली होती.
पायलटने मिसिसिपीमधील तुपेलो येथील वॉलमार्टवर विमान क्रॅश करण्याची धमकी दिली होती. पायलटच्या धमकीनंतर प्रशासनाने नागरिकांना सतर्क केलं होतं. धोक्याच्या पार्श्वभूमीवर वॉलमार्ट स्टोअर पूर्णपणे रिकामं केलं होतं. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार, पहाटे पाच वाजता ही घटना घडली.
Pilot who threatened to crash plane into Mississippi Walmart faces terror charges
— ANI Digital (@ani_digital) September 3, 2022
Read @ANI Story | https://t.co/4DlB8vPR1J#WalmartinMississippi #terrorcharges pic.twitter.com/NucNcCWC3v
पोलिसांनी पायलटला घेतलं ताब्यात
पायलटच्या या धमकीनंतर पोलीस आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांच्या खूप प्रयत्नांनंतर पायलट विमानाचं सुरक्षित लँडिंग करण्यास तयार झाला. त्यानंतर पायलटने अॅशलँडच्या नैऋत्य-पश्चिमेला एका शेतात विमानाचं सुरक्षित लँडिंग केलं. सध्या पोलिसांनी विमानाच्या पायलटला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
पायलटच्या धमकीनंतर हा परिसर रिकामा करण्यात आला
पायलटने विमान क्रॅश करण्याची धमकी दिल्यानंतर अधिकाऱ्यांची सुजली. घाईघाईत अधिकाऱ्यांनीही जागा रिकामी करण्यास सुरुवात केली. नागरिकांना तेथून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून प्रशासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत त्यांना या भागापासून अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान तुपेलो पोलीस अधिकारी विमानाच्या पायलटच्या सतत संपर्कात होते.
पायलट कोणत्याही प्रकारे त्यांची आज्ञा पाळतील आणि विमान सुरक्षितपणे उतरवता यावे यासाठी अधिकारी प्रयत्न करत राहिले. अखेर अधिकाऱ्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि पायलटला विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात यश आले.