एक्स्प्लोर
अमेरिकेवर शटडाऊनची वेळ, हजारो कर्मचारी घरी बसणार
शटडाऊन झाल्यामुळे अमेरिकेतील अनेक सरकारी विभाग बंद पडणार आहेत. हजारो कर्मचाऱ्यांना विनामोबदला (विदाऊट पे) सक्तीच्या रजेवर पाठवलं जाणार आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेसारख्या बलाढ्य देशावर आर्थिक संकट ओढावलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारवर शटडाऊनची वेळ आली आहे. परिणामी 80 हजार कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ येणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या वर्षपूर्तीची वेळ जवळ आलेली असताना त्यांना या जागतिक नामुष्कीला सामोरं जावं लागत आहे. हे शटडाऊन झाल्यामुळे अमेरिकेतील अनेक सरकारी विभाग बंद पडणार आहेत. हजारो कर्मचाऱ्यांना विनामोबदला (विदाऊट पे) सक्तीच्या रजेवर पाठवलं जाणार आहे.
अमेरिकेत अँटी डेफिशियन्सी अॅक्ट लागू आहे. त्यामुळे निधीची कमतरता असल्यास सरकारी यंत्रणांना त्यांचं कामकाज थांबवावं लागतं. निधीतील तूट भरुन काढण्यासाठी सरकारतर्फे 'स्टॉप गॅप बिल' आणलं जातं.
हे डील अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधी मंडळाने आणि सिनेट सदस्यांनी मंजूर करावं लागतं. सिनेट सदस्य याबाबत चर्चा करत असतानाच रात्रीचे बारा वाजले आणि त्यामुळे या विधेयकाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे अमेरिकेवर शटडाऊनची वेळ आली.
यापूर्वी बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना 2013 मध्येही दोन आठवडे सरकारी कामकाज पूर्णपणे बंद होतं. त्यामुळे 8 लाख कर्मचाऱ्यांना घरी बसावं लागलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement