US Election Result : बायडन यांनी मोडला ओबामांचा रेकॉर्ड; अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक मतं मिळवणारे पहिले उमेदवार
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे दावेदार जो बायडन यांनी ओबामा यांचा रेकॉर्ड मोडला आहे. एवढचं नाहीतर अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक मतं मिळवणारे पहिले उमेदवार ठरले आहेत. परंतु, अद्याप मतमोजणी सुरु असून अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष कोण? हे निश्चित होणं बाकी आहे.
वॉशिंग्टन : संपूर्ण जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतमोजणी सरु आहे. या निवडणूकीत डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्रपती उमेदवार यांनी एक रेकॉर्ड बनवला आहे. जो बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले असे राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनले आहेत. ज्यांना सर्वाधिक मतं मिळाली आहेत. त्यांनी ओबामा यांचाही रेकॉर्ड मोडीत काढला आहे. अमेरिकेतील निवडणुकांमध्ये 2008 साली ओबामा यांना 69,498,516 मतं मिळाली होती. ओबामा यांच्या कार्यकाळात उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या बायडन यांना आतापर्यंत 69,589,840 मतं मिळाली आहेत. अद्याप लाखो मतांची मोजणी करणं बाकी आहे.
पॉप्युलर मतांमध्ये ट्रम्प यांना टाकलं मागे
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत 66,706,923 मतं मिळाली आहेत. लाखो मतांची मोजणी अद्याप बाकी आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पही ओबामांचा रेकॉर्ड मोडू शकतात. दरम्यान, अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये पॉप्युलर मतं मिळवणाराच उमेदवार राष्ट्रपती पदी विराजमान होतो, असं नाही. निवडणूकांमध्ये विजय मिळवण्यासाठी 270 किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रोल मतं मिळवणं आवश्यक असतं. आतापर्यंत बायडन यांना 264 मतं मिळाली आहेत, तर ट्रम्प यांच्या खात्यात 214 इलेक्ट्रोरल मतं आहेत.
पाहा व्हिडीओ : जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर, विजयासाठी केवळ 6 इलेक्टोरल मतांची गरज
केवळ पॉप्युलर मतांनी विजय मिळवणं अशक्य
पॉप्युलर वोट्समध्ये जरी बायडन यांनी रेकॉर्ड बनवला असेल, तरिही अद्याप त्यांचा विजय निश्चित झालेला नाही. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकांमध्ये 2016 साली डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार हिलरी क्लिंटन यांना जवळपास 29 लाखांहून अधिक लोकांनी मतं दिली होती. परंतु, तरिदेखील त्यांचा या निवडणूकीत पराभव झाला. याच कारण म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पारड्यात इलेक्टोरल मतं जास्त होती.
असं 2000 मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्यासोबतही झालं होतं. तेसुद्धा डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार अलगोर यांच्या तुलनेत पॉप्युलर मतांमध्ये मागे पडले होते. परंतु, इलेक्टोरल मतं त्यांना 266 तुलनेत 271 मिळाले होते. 19व्या शतकात जॉन क्विंसी एडम्स, रदरफोर्ड बी हायेस आणि बेंजामिन हॅरिसनही पॉप्युलर मतांमध्ये मागे असूनही इलेक्ट्रोल मतांमुळे विजयी झाले होते.
अरिजोनामध्ये विजय मिळवू शकतात बायडन
ट्रंप यांनी ओहियो, फ्लोरिडा आणि टेक्सास यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच पेंसिल्वेनिया, विस्कॉन्सिन आणि मिशिगनमध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या आशा उंचावल्या आहेत. अरिजोनामध्ये बायडन विजयी होण्याची शक्यता आहे. 1996 नंतर या राज्यातील लोकांनी कधीच डेमोक्रेटिक राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी मतदान केलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
- बायडन विजयाच्या उंबरठ्यावर, पिछाडीवर असलेले ट्रम्प पोहोचले सुप्रीम कोर्टात
- US Elections 2020 : इलेक्टोरल वोटिंगमध्ये बायडन आघाडीवर, तर आतापर्यंत 22 पैकी 12 राज्यात ट्रम्प जिंकले
- US Elections : अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यावर! निकाल लांबणीवर, मतगणनेत घोटाळ्याचा आरोप
- US Elections: 'माझ्यासाठी जिंकणं सोपं, हार पचवणं कठिण', मतदानादरम्यान ट्रम्प यांचं ट्वीट