एक्स्प्लोर
पाकिस्तानला 'टेररिस्ट स्टेट' घोषित करण्यासाठी अमेरिकेत प्रस्ताव

वॉशिंग्टन : यूएनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचं बुधवारी भाषण होणार आहे. काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा शरीफ यावेळी उपस्थित करतील, असे बोलले जात आहे. मात्र, त्याआधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष निशणा साधला आहे. संयुक्त राष्ट्राच्या शेवटच्या भाषणात ओबामा यांनी म्हटलं की, भ्याड हल्ले बंद करा. अन्यथा दहशतवादच तुम्हाला भस्मसात करेल. कट्टरतावाद आणि धार्मांध हिंसा यांमुळे पश्चिम आशिया अस्थिर होत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे काश्मीर मुद्द्यावर भारताला घेरण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. शिवाय, काश्मीरसंदर्भात काही पुरावेही सादर करण्याची शक्यता बोलली जात आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये एक असा प्रस्ताव आणण्यात आला आहे, ज्याद्वारे पाकिस्तानला 'टेररिस्ट स्टेट'चा दर्जा दिला जाऊ शकतो. अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला आहे. पाकिस्तानी सरकार दहशतवादाला समर्थन करते, असा या प्रस्तावात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 90 दिवसांत एक रिपोर्ट सादर करणार आहेत, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादासंबधी पाकिस्तानच्या भूमिकेची माहिती असेल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























