एक्स्प्लोर

Russia Ukraine Conflict : रशियाची कोंडी होणार? 'या' देशांनी लागू केले रशियावर आर्थिक निर्बंध

Russia Ukraine News : रशियाने युक्रेनबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अमेरिकाआणि इतर देशांनी रशियाची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.

Russia Ukraine News : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचा भडका अजून उडाला नसला तरी त्या वादातून आता ठिणग्या पडायला सुरुवात झाली आहे.  युक्रेनवर हल्ला करण्यास रशियाच्या संसदेनं व्ल्वादिमीर पुतीन यांना परवानगी दिली. रशियाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता अमेरिकेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेनं युक्रेनला रशियाविरोधात लष्करी कुमक पुरवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ही घोषणा केली. त्याशिवाय अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंधाचीही घोषणा केली. 

रशियानं काल युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिल्यानंतर आता जगभरातून रशियाविरोधी भूमिका समोर यायला सुरुवात झाली आहे. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. ब्रिटननं ५ रशियन बँकांवर निर्बंध लादले आहेत. तर युरोपीयन संघही निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत रशियावर अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, कॅनडा या देशांनी रशियावर निर्बंध लागू केले आहेत. निर्बंधातून रशियाची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

या देशांनी लागू केले रशियावर आर्थिक निर्बंध

अमेरिका : अमेरिकेने रशियाच्या वित्तसंस्थांवर निर्बंध घातले आहेत. पश्चिमात्य देशांसोबतच्या व्यापारावरही अमेरिकेने बंदी घातली आहे. अमेरिकेने रशियावर 2014  पेक्षाही अधिक निर्बंध लागू करण्याचा इशारा दिला आहे.

ब्रिटन : पाच रशियन बँकांवर ब्रिटनकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. या आर्थिक निर्बंधांमुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम होणार आहे.
 
जर्मनी : 'नॉर्ड स्ट्रीम २' वायुवाहिनी रोखण्याची घोषणा जर्मनीने केली आहे. रशियातून जर्मनीला गॅस पुरवठा करण्यात येतो. 

कॅनडा : रशियानं मान्यता दिलेल्या डोन्टेस्क, लुहान्स्क प्रांतांशी व्यवहार करण्यास कॅनडा सरकारने मनाई केली आहे. या प्रांतांना मान्यता देणाऱ्या रशियन खासदारांवर बंदी घालण्यात आली आहे.

युरोपीयन महासंघदेखील रशियावर निर्बंध घालण्याची दाट शक्यता आहे. 

युक्रेनमधून भारतीय परतले 

युक्रेनवर हल्ल्याची तयारी रशियानं केली आहे. तर, दुसरीकडे  युद्धाचे ढग दाटलेल्या युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. सुमारे २० हजार भारतीय अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत. युक्रेनमधून २४२ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं पहिलं विमान रात्री भारतात परतलं. युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी आणि अन्य नागरिकांना घेऊन काल संध्याकाळी ६ वाजता निघालेलं विमान रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी दिल्ली विमानतळावर उतरलं. मायदेशी परतल्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडल्याची भावना यापैकी काही नागरिकांनी व्यक्त केली, तर सरकारच्या सूचनेनुसार परतल्याचं काही विद्यार्थ्यांनी सांगितलं.

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget