US Warns India : भारताच्या सीमेवर घुसखोरी, अमेरिकेने चीनला झापले, संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांचे मोठे वक्तव्य
US Warns India : सिंगापूरमध्ये तीन दिवसीय शांग्री-ला डायलॉग सुरू आहे. यामध्ये बोलताना अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी चीनला इशारा दिला आहे.
US Warns India : चीनकडून LAC वर सतत आगळीक सुरूच आहे. चीनच्या या हरकतींवरून अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी चीनला इशाला दिला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी म्हटले आहे की, चीन भारताला लागून असलेल्या सीमेवर आपले दावे मजबूत करत आहे. दरम्यान, LAC वर सुरू असलेल्या वादावरून अमेरिकेकडून एका आठवड्यात दोन वेळा चीनला इशारा देण्यात आला आहे.
सिंगापूरमध्ये तीन दिवसीय शांग्री-ला डायलॉग सुरू आहे. यामध्ये बोलताना लॉयड ऑस्टिन यांनी चीनला इशारा दिला आहे. "इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनचा वाढता विस्तार आणि भारताला लागून असलेल्या सीमेवर चीनकडून आपला दावा सतत मजबूत केला जात आहे, असे लॉयड यांनी म्हटले आहे. याबरोबरच अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी भारताच्या वाढत्या लष्करी-क्षमता आणि तांत्रिक सामर्थ्याचे कौतुक केले आहे.
दरम्यान, अमेरिकन लष्कराचे वरिष्ठ कमांडर जनरल मायकेल फ्लिन नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी देखील चीनच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि LAC वर चीनकडून करण्यात येत असलेली लष्कराची तैनातीवर प्रश्न उपस्थित केले होते.
पूर्व लडाखला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चीनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत, चीनची पीएलए आर्मी आपली संरक्षण पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि LAC च्या शेजारील भागात लष्करी तैनाती करण्यासाठी काम करत आहे. चिनी सैन्याने वादग्रस्त पॅंगोंग-त्सो तलावावर दोन पूल तयार केले आहेत.
या वादावरून दोन्ही देशांदरम्यान लष्करी कमांडर-स्तरीय बैठकांच्या 15 फेऱ्या झाल्या आहेत. त्यानंतर अनेक ठिकाणी सैन्याने माघार घेतली आहे. परंतु अजूनही अनेक भागात वाद सुरू आहेत. अशा स्थितीत अमेरिकेच्या संरक्षण सचिवांचे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शांग्री-ला डायलॉगमध्ये चीनला लक्ष्य केले. अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी म्हटले की, पीआरसी म्हणजे पीपल्स रिपब्लिकमध्ये चीनच्या इतर देशांसोबत तणाव वाढत आहे. चीन आपला बेकायदेशीर सागरी दावा करण्यासाठी दक्षिण चीन समुद्रातील मानवतावादी बेटांवर आधुनिक शस्त्रे तैनात करत आहे. चिनी जहाजे इतर देशांच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे घुसून लूट करत आहेत. इंडो-पॅसिफिक म्हणजेच इंडो-पॅसिफिकमधील कोणत्याही देशाने राजकीय-धोका, आर्थिक दबाव किंवा सागरी मिलिशियाचा छळ सहन करू नये.