(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War : पेटलेलं युद्ध थांबणार का? रशियासोबत चर्चा करण्यासाठी युक्रेनची तयारी
लवकरच रशिया आणि युक्रेन या दोन देशामध्ये सुरु असलेलं युद्ध थांबण्याचे संकेत मिळत आहे. कारण युक्रेन रशियासोबत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती मिळत आहे
Russia Ukraine War : गेल्या चार दिवसापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. यामुळे तिथे भितीदायक स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, लवकरच या दोन देशामध्ये सुरु असलेलं युद्ध थांबण्याचे संकेत मिळत आहे. कारण युक्रेन रशियासोबत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती मिळत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन चर्चेसाठी आम्ही तयार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
युद्ध थांबवून चर्चेतून मार्ग काढला जावा अशी मागणी जगभरातून होत असताना एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार रशिया आणि युक्रेन सरकारने शुक्रवारी चर्चेतून तोडगा काढण्याबाबत संकेत दिले आहेत. युक्रेन आणि रशियामध्ये चर्चेसाठी वेळ आणि स्थळ निश्चित करण्याबाबत अद्याप चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. दुसरीकडे किव्हमधील अधिकाऱ्यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केलं आहे. दशकातील सर्वात वाईट युरोपीय सुरक्षा संकटात रशियन सैन्याला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी आणि राजधानीचे रक्षण करण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनचे राष्ट्रपती व्होदिमर झेलेन्स्की यांचे प्रवक्ते सर्गेई न्याकिफोरोव यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे की, आक्रमण सुरु झाल्यानंतर चर्चेतून मार्ग काढण्याबाबत आशेचं पहिलं किरण दिसू लागलं आहे. सर्गेई न्याकिफोरोव यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे की, युक्रेन युद्धविराम आणन शांततेसाठी चर्चा करण्यासाठी तयार होतं आणि आहे. त्यांनी म्हटलं की, युक्रेन आणि रशियामध्ये चर्चेसाठी स्थळ आणि वेळ निश्चित करण्याबाबत चर्चा सुरु आहे.
या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात लोक युक्रेन सोडत आहेत. एएफपी न्यूजच्या वृत्तानुसार, एक लाख युक्रेनच्या नागरिकांनी आतापर्यंत देशातून पलायन केले आहे. या सर्वांनी पोलांडमध्ये शरणागती घेतली आहे. एएफपी न्यूज एजेन्सीनुसार, पोलांडचे उप गृह मंत्री पावेल जेफर्नकर यांच्या मते, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जवळपास एक लाख युक्रेनच्या नागरिकांनी पोलांडची सीमा पार केली आहे. आम्ही युक्रेनशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत, मात्र आधी युक्रेनच्या लष्कराला युद्ध थांबवावं लागेल, असं म्हणत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लेवरोव्ह यांनीदेखील नरमाईची भूमिका स्वीकारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: