UK PM Race : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक की लिझ ट्रस? शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण, सोमवारी लागणार निकाल
Britain New PM : सोमवारी ब्रिटनला नवे पंतप्रधान मिळतील. ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि लिझ ट्रस (Liz Truss) यांच्यातील पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील मतदानाचा शेवटचा टप्पा शुक्रवारी संपला.
Rishi Sunak VS Liz Truss : ब्रिटनसाठी सोमवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. सोमवारी ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा केली जाईल. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस (Liz Truss) यांच्यात चढाओढ आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी शुक्रवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. 1,60,000 सदस्यांनी यासाठी मतदान केलं आहे. त्यानंतर आता सोमवारी मतदानाचा निकाल जाहीर करण्यात येईल. यासोबतच ब्रिटनला नवे पंतप्रधान मिळतील.
ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यामध्ये जोरदार टक्कर
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यामध्ये जोरदार टक्कर आहे. काही सर्वेक्षणानुसार मतदानाच्या शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये ऋषी सुनक हे लिझ ट्रस यांच्या पुढे असल्याचं बोललं जात आहे. तक काही सर्वेक्षणानुसार लिझ ट्रस यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे. याचा निकाल आता सोमवारीचं समोर येईल.
पाच फेऱ्यांमध्ये ऋषी सुनक यांना सर्वाधिक मतं
पाचव्या फेरीत ऋषी सुनक यांना सर्वाधिक मतं मिळाली आहेत. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मतं मिळाली होती. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मतं मिळाली. सोमवारी झालेल्या तिसऱ्या फेरीच्या मतदानात त्यांना 115 मतं मिळाली. तसेच दुसऱ्या फेरीत 101 तर पहिल्या फेरीत 88 मतं मिळाली. तर लिझ ट्रस यांना चौथ्या फेरीत 86, तिसऱ्या फेरीत 71, दुसऱ्या फेरीत 64 आणि पहिल्या फेरीत 50 मतं मिळाली. पेनी मॉर्डाउंट यांना चौथ्या फेरीत 92, तिसऱ्या फेरीत 82, दुसऱ्या फेरीत 83 आणि पहिल्या फेरीत 67 मते मिळाली.
बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा
बोरिस जॉन्सन यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत भारतीय वंशाचे अर्थ मंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला होता. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून एका दिवसात 39 मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे जॉन्सन यांच्यावर राजीनाम्याचा मोठा दबाव निर्माण झाला होता. त्यानंतर बोरिस जॉन्सन यांनाही राजीनाम द्यावा लागला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या