Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 100 पाऊंडचा दंड, भारताच्या जावयाला 'ही' चूक पडली महागात
UK PM Fined : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी चालत्या कारमध्ये सीटबेल्ट न लावल्यानं त्यांना स्थानिक पोलिसांनी दंड ठोठावला आहे.
![Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 100 पाऊंडचा दंड, भारताच्या जावयाला 'ही' चूक पडली महागात uk pm fined 100 pounds for not wearing seat belt rishi sunak accepts mistake apologises Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 100 पाऊंडचा दंड, भारताच्या जावयाला 'ही' चूक पडली महागात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/20/73bfa335d460d72a2420066bc4e2aaf81674206345447653_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
British Prime Minister Rishi Sunak Fined : पाश्चिमात्य देश त्यांचे नियम आणि कायद्यांबाबत किती कठोर आहेत, हे आपण यापूर्वीही पाहिलं आहे. तेथील नियम म्हणजे, नियम आणि ते सर्वांसाठी सारखेच असतात. मग ती सर्वसामान्य व्यक्ती असो अथवा देशाचे पंतप्रधान. सध्या असंच एक प्रकरण चर्चेत आहे. ते म्हणजे, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर नियम मोडल्याप्रकरणी झालेल्या कारवाईचं.
ब्रिटनचे पंतप्रधान (Britain Prime Minister) भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना सीटबेल्ट (Seat Belt) न लावणं महागात पडलं आहे. त्यांना स्थानिक पोलिसांनी 100 पाऊंडचा दंड ठोठावला आहे. ऋषी सुनक यांनी आपली चूक मान्य केली आहे. तसेच, सुनक यांनी गुरुवारी आपल्या चुकीबद्दल माफीही मागितली आहे. सूनक यांनी एक व्हिडीओ शूट करताना चालत्या गाडीमध्ये सीट बेल्ट काढला होता, ही चूक त्यांनी मान्य केली आहे.
सुनक यांना 100 पाऊंडचा दंड
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना कारमध्ये सीट बेल्ट न लावल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. चालत्या कारमध्ये सीटबेल्ट न लावल्याबद्दल ऋषी सुनक यांना 100 पाऊंडचा दंड ठोठावण्यात आला आहे. ब्रिटन सरकारच्या नवीन धोरणाची घोषणा करण्यासाठी ऋषी सुनक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओ शूटच्या वेळी ऋषी सुनक कारमधून प्रवास करत होते आणि यावेळी त्यांनी सीटबेल्ट लावला नव्हता. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी सुनक यांना दंड ठोठावला आहे.
सीटबेल्ट न लावल्यास 100-500 पाऊंडपर्यंत दंड
ब्रिटनमध्ये कारमध्ये सीटबेल्ट न लावल्यास प्रवाशांना 100-500 पाऊंडपर्यंत दंड आकारला जातो. वैध वैद्यकीय कारणास्तव दंडात सूट दिली जाऊ शकते. इंग्लंडमधील कायद्यानुसार, 14 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व प्रवाशांनी कारमध्ये प्रवास करताना सीट बेल्ट लावणे वाहन कायद्यानुसार बंधनकारक आहे. सुनक यांना सीटबेल्ट न लावल्यामुळे पोलिसांनी 100 पाऊंड म्हणजे सुमारे 10032 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
British Prime Minister Rishi Sunak : पाहा व्हिडीओ : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना सीटबेल्ट न लावणं महागात पडलं
सुनक यांना दुसऱ्यांदा ठोठावला दंड
ब्रिटन सरकारमध्ये असताना ऋषी सुनक यांना दंड ठोठावण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षीही ऋषी सुनक यांना कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम मोडल्यासंदर्भातही दंड ठोठावण्यात आला होता. ब्रिटनमध्ये कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल आकारल्या जाणार्या दंडाला फिक्स्ड पेनल्टी (निश्चित दंड) असं म्हणतात. दंड ठोठावल्यानंतर 28 दिवसांच्या आत दंड भरावा लागेल किंवा या दंडाला न्यायालयात आव्हान द्यावे लागते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)