कोरोनावरील उपचारांनंतर डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले!
अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकांच्या तयारीत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प व्यस्त असतानाच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना वॉल्टर रीड रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं.
न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प उपचारानंतर व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. ट्रम्प यांना पुन्हा उपचारांची गरज भासली तर त्यांच्यावर व्हाईट हाऊसमध्येच उपचार करण्यात येणार आहेत. अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकांच्या तयारीत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प व्यस्त असतानाच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना वॉल्टर रीड रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली होती. परंतु, त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं नव्हतं.
व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, 'कोरोना व्हायरसला आपल्या जीवनावर वर्चस्व घेऊ देऊ नका.' त्यांनी वॉल्टर रीड रूग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेसचे आभार मानले. तसेच ते म्हणाले की, 'रूग्णालयात त्यांना कोरोना व्हायरसबाबत अनेक गोष्टी समजल्या आहेत. आपल्याकडे सर्वोत्तम वैद्यकिय सुविधा आहेत. त्यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही.' तसेच त्यांनी स्वतःची खुशाली सांगताना आपण आता ठिक असल्याचं सांगितलं.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 5, 2020
दरम्यान, यावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण अमेरिकेत कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसमुळे आतापर्यंत जवळपास 2 लाख 10 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. परंतु, डोनाल्ड ट्रम्प अजूनही लोकांना न घाबरण्याचं आवाहन करत आहे. तसेच रूग्णालयातून व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मास्कही काढला आणि त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले.
ट्रम्प यांना सुट्टी मिळाल्यानंतर ग्रेट वाल्टर रीड मेडिकल सेंटर डॉक्टरांनी प्रेस कॉन्फरंस घेतली. डॉक्टरांनी सांगितलं की, राष्ट्रपती आता ठिक असून त्यांना श्वास घेण्यास कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तसेच गेल्या 72 तासांपासून त्यांना तापही आलेला नाही. राष्ट्रपती ट्रम्प यांची ऑक्सिजन पातळीही सामान्य आहे. याआधी 4 ऑक्टोबर रोजी काही वेळासाठी ते गाडीतून रूग्णालयाच्या बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या समर्थकांनी केलेलं अभिवादन स्विकार केलं होतं.'
डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना, पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मित्र डोनाल्ड, लवकर बरे व्हा!'
डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्र्म्प यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती केलं होतं. त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली होती. ट्रम्प यांचे डॉक्टर सीन कॉनली यांनी सांगितलं की, गुरुवारी सायंकाळी त्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. काल त्यांनी कोरोना झाल्याचं सांगत क्वारंटाईन होत असल्याचं म्हटलं होतं.
त्यावेळी एक व्हिडीओ ट्वीट करत ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, 'मी सर्वांचे आभार मानतो, मी वॉटर रीड हॉस्पिटलला चाललो आहे. मला वाटतं मी ठीक आहे मात्र सर्व गोष्टी व्यवस्थित व्हायला हव्यात म्हणून मी दवाखान्यात दाखल होतोय. फर्स्ट लेडी देखील ठीक आहेत. मी सर्वांचे पुन्हा आभार मानतो, हे प्रेम कधीही विसरणार नाही.'
कोरोनाची बाधा झाल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली होती. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय की, मी आणि माझी पत्नी मेलेनियाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही तात्काळ क्वारंटाईन झालो आहोत.
त्या दिवशी लोकांना अर्धवट माहिती दिली.. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची प्रकृती गंभीर होती : व्हाइट हाउस
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती शुक्रवारी खूपचं गंभीर होती, अशी धक्कादायक माहिती व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मीडोज यांनी दिली. कोरोनाचे निदान झाल्यानंतर ट्रम्प यांच्या प्रकृती विषयी जनतेला अर्धवटचं माहिती देण्यात आली होती. ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांना शुक्रवारी कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. शनिवारी रात्री प्रसारित झालेल्या फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मीडोजने खुलासा केला. ज्यात 74 वर्षीय राष्ट्राध्यक्षांच्या तब्येतीविषयी जी माहिती लोकांसमोर आली त्यात विरोधाभास असल्याचे समोर आले आहे.
फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मीडोज म्हणाले, "ट्रम्प यांना सध्या ताप नाही आणि त्यांची ऑक्सिजन लेवलही चांगली आहे. मात्र, काल आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता लागली होती. त्यांना ताप आला होता आणि त्याच्या ऑक्सिजनची पातळी वेगाने खाली येत होती, परंतु असे असूनही राष्ट्रपती उभे राहून चालू लागले."
महत्त्वाच्या बातम्या :