एक्स्प्लोर

Turkiye Earthquake : तुर्की-सीरियात हाहा:कार! भूकंपातील बळींचा आकडा 6200 वर 

Turkiye Earthquake : तुर्कीत सर्वाधिक विध्वंस पाहायला मिळाला. भूंकपाच्या तीव्र धक्क्यांमुळे रस्ते खचले आहेत. शेकडो इमारती कोसळल्यात. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकलेत.

Turkiye Earthquake : तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या विनाशकारी भूकंपातील बळींची संख्या आता 6200 वर पोहोचली आहे. बचावकार्य सध्या वेगात सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मृताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. या भीषण घटनेमुळे तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी भूकंपग्रस्त भागात तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे. डब्ल्यूएचओनेही उर्वरित देशांना सीरियाला जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी सकाळी 7.8, 7.6 आणि 6.0 रिश्टर स्केल तीव्रतेचे सलग तीन विनाशकारी भूकंप झाले. यामध्ये आतापर्यंत 6200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओनं  भूकंपामुळे दोन्ही देशातील 23 कोटी लोकांना या फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवला आहे.

तुर्किमध्ये मदत बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या भूकंपाची विदारक दृश्यं समोर आली आहेत. उत्तर सीरियात एका घराच्या ढिगाऱ्यातून नवजात अर्भकाला जिवंत बाहेर काढण्यात आले. परंतु, त्याच्या आईचा मात्र मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

भारताकडून मदतीचा हात -

भारताने मंगळवारी श्वान पथक, आर्मी फील्ड हॉस्पिटल आणि चार लष्करी विमानांमध्ये मदत सामग्रीसह शोध आणि बचाव पथक तुर्किये येथे पाठवले. 30 खाटांची वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी भारताने तुर्कि येथे भारतीय लष्कराचे फील्ड हॉस्पिटल पाठवले. आयएएफच्या पहिल्या विमानात 45 सदस्यीय वैद्यकीय पथक रवाना करण्यात आले. ज्यामध्ये क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट आणि सर्जन यांचा सहभाग होता. यामध्ये एक्स-रे मशिन, व्हेंटिलेटर, ओटी आदी उपकरणेही पाठवण्यात आली.  

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाने एकूण चार विमाने तुर्की येथे पाठवली आहेत. चौथे विमान उर्वरित फील्ड हॉस्पिटलसह  तुर्कीकडे रवाना झाले. यामध्ये भारतीय लष्कराच्या वैद्यकीय पथकातील 54 सदस्यांचा तसेच सुविधा उभारण्यासाठी वैद्यकीय आणि इतर उपकरणांचा समावेश होता. 

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्वीट केले आहे की,  "6 टन आपत्कालीन मदत घेऊन IAF विमान सीरियाला रवाना झाले आहे. यात जीव वाचवणारी औषधे आणि आपत्कालीन वैद्यकीय पुरवठा यांचा समावेश आहे. या दुर्घटनेचा सर्वाधिक फटका बसलेल्या लोकांना मदत करण्यात भारत तत्पर आहे.  

तीन महिन्यांसाठी आणीबाणी -

तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी मंगळवारी भूकंपामुळे प्रभावित झालेल्या 10 आग्नेय प्रांतांमध्ये तीन महिन्यांसाठी आणीबाणीची घोषणा केली. एर्दोगन म्हणाले की मानवतावादी मदत कर्मचारी आणि आर्थिक मदतीसह प्रभावित भागात अनेक आपत्कालीन उपाययोजना केल्या जातील. आम्ही या निर्णयाशी संबंधित प्रक्रिया लवकर पूर्ण करू, ज्यामध्ये आमचे 10 प्रांत समाविष्ट असतील. भूकंप झालेल्या प्रदेशात 50,000 हून अधिक मदत कर्मचारी पाठवले आहेत.

रस्त्याशेजारील इमारती, घरंही कोसळली. तुर्कीत सर्वाधिक विध्वंस पाहायला मिळाला. प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन पळत होता. तुर्कीत भूंकपाच्या तीव्र धक्क्यांमुळे रस्ते खचले आहेत. रस्त्यांवर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. शेकडो इमारती कोसळल्यात. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकलेत. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोकांना घरातून सुरक्षित स्थळी जाण्याचाही वेळ मिळाला नाही. त्यामुळे अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Kambli Achrekar Sir :सर जो तेरा चकराये..कांबळीनं गायलं आचरेकरांचं आवडतं गाणंDevendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरVarsha Bunglow Meeting : शपथविधीआधी महत्वाच्या खात्यासंदर्भात ठोस निर्णय? 'वर्षा'वर खलबतंDevendra Fadnavis Maharashtra Vidhansabha : भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Embed widget