Trending : लग्नानंतर पत्नीने 141 किलो तर पतीने 43 किलो वजन कमी केले, दोघांचा नवा लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Viral News : हा पल्ला गाठण्यासाठी दोघांना 18 महिने लागले. या दरम्यान, त्यांना बाहेरचे खाणे, दारू पिणे या सर्व गोष्टींचा त्याग करावा लागला. आज त्यांचे हे नवे रूप पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे.
Trending News : आधुनिक जीवनशैलीत लठ्ठपणा ही गंभीर समस्या बनत चालली आहे. लाखो लोक या आजाराशी झुंज देत आहेत. काही लोक याला दैवी देणगी मानून हातावर हात ठेवून बसतात. तर काही लोक मेहनत करून त्यातून सुटका करून घेतात. आज आम्ही तुम्हाला अशा जोडप्याबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी लग्नानंतर अनेक किलो वजन कमी केलं आहे. त्याचा हा नवा लूक पाहून सारे जग थक्क झाले आहेत.
दोघांचे लग्न 2016 मध्ये झाले :
लेक्सी रीड (Lexi Reed) आणि डॅनी रीड (Danny reed) यांचं लग्न 2016 मध्ये झालं. लग्नाच्या वेळी लेक्सीचे वजन 219 किलो होते तर डॅनीचे वजन 127 किलो होते. दोघेही त्यांच्या वजनाने खूप नाराज होते. पण, त्यानंतर दोघांनीही वजन कमी करण्याचा ध्यास घेतला. लेक्सीने लग्नानंतर तब्बल 141 किलो आणि डॅनीने 43 किलो वजन कमी केले. मात्र, या ट्रान्सफॉर्मेशनसाठी त्यांना 18 महिन्यांची प्रतिक्षा करावी लागली. तितकीच मेहनतही घ्यावी लागली. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. या दोघांचेही ट्रान्सफॉर्मेशन पाहून लोक थक्क झाले आहेत.
खरंतर, हा प्रवास लेक्सी आणि तिच्या नवऱ्यासाठी अजिबात सोपा नव्हता. यासाठी दोघांनाही खूप त्याग करावा लागला. दोघांनी वर्षभर बाहेरचे जेवण खाल्ले नाही. दारू प्यायली नाही. कोणताच चिट डे केला नाही आणि आज निकाल तुमच्या समोर आहे. लेक्सीने सांगितले की जेव्हा ती 25 वर्षांची होती तेव्हा तिचे वजन 177 किलो होते.
वजनामुळे लेक्सीला मुले होऊ शकली नाहीत :
लेक्सीने सांगितले की, त्या दोघांनाही खाण्यापिण्याची खूप आवड होती. दोघेही बहुतेकदा बाहेरून जेवण मागवायचे. त्यामुळे दोघांची कारणे वाढतच गेली. त्याने सांगितले की आम्ही दोघे तासनतास जेवायचो, पण वजन वाढल्यामुळे आम्हाला शारीरिक त्रास होऊ लागला. आम्ही बाईक चालवू शकत नव्हतो. त्यानंतर आम्ही आमची जीवनशैली बदलण्याचा विचार केला. लेक्सीने सांगितले की, डॉक्टरांनी तिला असेही सांगितले होते की, जर तिने मुलाला जन्म दिला तर आई किंवा मुलाचा मृत्यू होऊ शकतो. यानंतर दोघांनीही आठवड्यातून पाच दिवस व्यायाम करायला सुरुवात केली आणि आज हा बदल तुमच्यासमोर आहे.
महत्वाच्या बातम्या :
- kosk mask : मास्क वापरण्यातील 'ही' कटकट संपली; कोरियन कंपनीचा भन्नाट शोध
- Omicron Origin : खरंच उंदरातून माणसांमध्ये आला ओमायक्रॉन?, अभ्यासातील दावा
- Trending : मला कोरोना झालाय, रजा हवी, गंडवणाऱ्या महिलेला बॉसकडून मोठी शिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha