kosk mask : मास्क वापरण्यातील 'ही' कटकट संपली; कोरियन कंपनीचा भन्नाट शोध
Atman या कोरियन (South Korea) कंपनीनं हा मास्क डिझाइन केला आहे.
kosk mask : दक्षिण कोरियामधील (South Korea) एका कंपनीने "कोस्क" (kosk) नावाचा मास्क लाँच केला आहे. हा मास्क जेवण करत असताना किंवा पाणी पिताना दुमडला जाऊ शकतो. हा मास्क दुमडल्यानंतर फक्त नाक झाकले जाऊ शकते. Atman या कोरियन कंपनीनं डिझाइन केलेल्या मास्कच्या सेटचा एक बॉक्स 8 डॉलरपेक्षा जास्त किमतीत उपलब्ध आहे. मास्कच्या या सेटमध्ये एकूण दहा मास्क असतात. हा मास्क दक्षिण कोरियाच्या वेबसाइटवरून लोक ऑर्डर करू शकतात.
कोस्क मास्क हे नाव मास्क आणि को अशा दोन शब्दांचा वापर करून तयार करण्यात आलं आहे. कोरियन भाषेत नाकाला 'को' असं म्हणलं जातं. काही लोकांनी या मास्कच्या डिझाइनला पसंती दिली तर काही लोकांनी कोस्क मास्कच्या कंपनीला ट्रोल केले. 'नेहमीच नाकाखाली मास्क घालणारे लोक या मास्कचा वापर सहज करू शकतात.', अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली.
Will eat or drink but still want a layer of protection against #COVID19? Researchers in Mexico created a nose-only mask to protect vs the coronavirus even when eating or drinking. Carlos Jasso, Reuters pic.twitter.com/lkYi9JX5TA
— ABS-CBN News (@ABSCBNNews) March 25, 2021
कोस्क मास्कच्या कंपनीप्रमाणेच या आधी देखील काही कंपन्यांनी मास्कच्या हटके डिझाइन लाँच केल्या होत्या. रॉयटर्स आणि जेरुसलेम यांच्या अहवालानुसार, मेक्सिकन संशोधकांनी मार्च 2021 मध्ये मास्कचं एक हटके डिझाइन लाँच केलं.
진짜로 나와버린 코스크 pic.twitter.com/p58WrYGFLe
— 무슨 일이 일어나고 있나요? (@museun_happen) January 29, 2022
दक्षिण कोरियामध्ये गुरूवारी कोरोनाचे 22,907 रूग्ण तर बुधवारी 20,000 रूग्ण आढळले.
इतर बातम्या :
Trending : मला कोरोना झालाय, रजा हवी, गंडवणाऱ्या महिलेला बॉसकडून मोठी शिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha