डोनाल्ड ट्रम्प यांचा ऑगस्ट 2025 मध्ये अंत होणार, 'The Simpsons' ची भविष्यवाणी
The Simpsons on Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा ऑगस्ट 2025 मध्ये अंत होणार असल्याची भविष्यवाणी The Simpsons कडून करण्यात आलीये. The Simpsons ही उपरोधात्मक विनोद करणारी मालिका आहे.

The Simpsons on Donald Trump : तीन दशकांहून अधिक काळापासून The Simpsons या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि भविष्यातील घटनांचे अचूक भाकित करण्याची अजब ताकद देखील दाखवली. राजकारण असो वा पॉप कल्चर, या लोकप्रिय अॅनिमेटेड सिटकॉमने अनेकदा विनोदी उपरोधातून आश्चर्यचकीत करणारं भाकीत केलं आहे. 2025 च्या San Diego Comic-Con मध्ये The Simpsons चे निर्माते मॅट ग्रोनिंग यांनी डोनाल्ड ट्रम्पच्या मृत्यूबद्दल, एलॉन मस्क यांच्या मंगळ मोहिमेबद्दल नवीन अंदाज वर्तवले आहेत.
The Simpsons मालिकेची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालीये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांचा 2025 मध्ये मृत्यू होईल असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवरील एका पेजने हा व्हिडीओ शेअर केलाय. The Simpsons ही अमेरिकेतील एक प्रसिद्ध अॅनिमेटेड सिटकॉम मालिका आहे. या मालिकेला वास्तविक घटनांची अचूक भाकितं करण्यासाठी ओळखलं जातं.
ट्रम्पच्या मृत्यूवर The Simpsons प्रतिक्रिया आणि मस्क यांची मंगळ मोहीम
मॅट ग्रोनिंग यांनी डोनाल्ड ट्रम्पच्या मृत्यूवर अमेरिकन जनतेची प्रतिक्रिया कशी असेल, यावर उपरोधिक भाष्य केलं. "लोक रस्त्यांवर नाचायला लागतील" पण भविष्यातील एक काल्पनिक राष्ट्राध्यक्ष "व्हान्स" या नाचण्यावर पूर्णतः बंदी घालतील. हे भाकीत राजकीय उपरोधातून करण्यात आलं आहे. कारण ट्रम्पसारख्या ध्रुवीकरण करणाऱ्या नेत्यांवर जनतेच्या टोकाच्या प्रतिक्रिया येतात, हे The Independent नेही नमूद केलं. The Simpsonsच्या पद्धतीनुसार, ग्रोनिंग यांनी या बातमीतील आनंद आणि वाद दोन्ही गोष्टींना हसत आणि हसवत मांडलं.
View this post on Instagram
एलॉन मस्कबाबत ग्रोनिंग यांनी आणखी धाडसी भविष्यवाणी केली. एलॉन मस्क हे मंगळावर पोहोचणारे पहिले मनुष्य बनतील, पण त्यांचं यान अपघातात कोसळेल आणि तो मंगळावर अडकून बसेल. तरीही मस्क पृथ्वीवर संदेश पाठवत राहील आणि दूर अंतरावरून चाहत्यांचे जल्लोष ऐकत राहतील. या साऱ्यांमधून The Simpsons ची राजकीय उपरोधात्मक शैली पुन्हा एकदा लोकांच्या भेटीला आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























