एक्स्प्लोर
'द रॉक' लढवणार अमेरिकेच्या 2020 राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक!
लॉस एंजेलिस: WWE मधील 'द रॉक' उर्फ ड्वेन जॉन्सन हा 2020 साली अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे. 'ऐसशोबिज डॉट कॉम' वेबसाइटनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर बोलताना अभिनेता ड्वेन जॉन्सननं सांगितलं की, 2020 सालची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
ड्वेन जॉन्सनच्या मते, 'लोकांची मदत करण्यासाठी ती मोठी संधी असेल. त्यामुळे ही गोष्ट शक्य होऊ शकते. 2016च्या निवडणुकीनं दाखवून दिलं आहे की, काहीही होऊ शकतं.' जॉन्सनला राजकारणाचा अनुभव नसला तरीही तो अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतो. 2000 साली त्याने रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेशनच्या दरम्यान युवा वर्गाला मतदानासाठी अपील केलं होतं.
दरम्यान, भारतात दोन डिसेंबरला प्रदर्शित होणारा 'मोअना' या सिनेमातील एका प्रमुख पात्राला जॉन्सननं आपला आवाज दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement