एक्स्प्लोर
शिक्षिकेवर गोळीबार करुन पतीची शाळेतच आत्महत्या, विद्यार्थीही ठार
सॅन बर्नार्डिनो, कॅलिफोर्निया : पत्नीशी फारकत घेतलेल्या इसमाने ती शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या शाळेत गोळीबार केला आहे. या गोळीबारात त्याच्या पत्नीसह एका विद्यार्थ्यालाही प्राण गमवावे लागले आहेत. पत्नीवर गोळीबार केल्यानंतर त्यानेही गोळी झाडून आत्महत्या केली.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील बर्नार्डिनोमध्ये ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. पत्नी एलन स्मिथ शिकवत असलेल्या प्राथमिक शाळेत आरोपी गेला. त्यानंतर एक शब्दही न बोलता त्याने तिच्यावर गोळी झाडली. यामध्ये 53 वर्षीय शिक्षिकेसह तिच्या आठ वर्षांच्या एका विद्यार्थ्याचाही मृत्यू झाला, तर 9 वर्षांचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर शेकडो पालक शाळेबाहेर जमा झाले. मात्र त्यांना चिमुरड्यांची पुनर्भेट होईपर्यंत त्यांचा जीव वर-खाली होत होता.
शाळेचे कर्मचारी आरोपी केड्रिक अँडरसनला ओळखत होते. आरोपी आणि शिक्षिका गेल्या महिन्याभरापासून वेगळे राहत होते. पत्नीला काही वस्तू देण्याच्या बहाण्याने आरोपीने शाळेत प्रवेश मिळवला. अँडरसनवर घरगुती हिंसाचार, ड्रग्ज आणि शस्त्रास्त्र बाळगल्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
परभणी
जळगाव
राजकारण
Advertisement