Sri Lanka: निदर्शनांमुळे आपण डॉलर गमावत आहोत, श्रीलंकेतील आंदोलनकर्त्यांवर राजपक्षे यांनी फोडलं खापर
Sri Lanka News: भीषण आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेत सरकार आणि राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्याविरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरून निदर्शन करत आहे.
Sri Lanka News: भीषण आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेत सरकार आणि राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्याविरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरून निदर्शन करत आहे. अशातच आंदोलनकर्त्यांना समजावण्यासाठी श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी जनतेला संबोधित केलं.
'अर्थव्यवस्था ढासळत असतानाही लॉकडाऊन लागू करावे लागले'
राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांचे मोठे बंधू पंतप्रधान महिंदा राजपक्षे म्हणाले, "कोरोनाचा सामना केल्यानंतर लगेचच आम्ही या संकटाचा सामना करत आहोत. देशाची अर्थव्यवस्था ढासळल्यानंतरही आम्हाला लॉकडाऊन लागू करावे लागले आणि त्यामुळे देशात परकीय चलन संपलं." ते म्हणाले, “श्रीलंकेला या सध्याच्या संकटातून कसे बाहेर काढता येईल यासाठी राष्ट्रपती आणि मी प्रत्येक क्षण प्रयत्न करत आहोत.”
राजपक्षे यांनी आंदोलनकर्त्यांना सरकारविरोधी आंदोलन संपवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, ''निदर्शनांमुळे प्रत्येक मिनिटाला आपण डॉलर्स गमावत आहोत. मी निषेधादरम्यान राष्ट्रध्वज फडकताना पाहतो. श्रीलंकेच्या प्रत्येक भागात मुक्तपणे ध्वज प्रदर्शित करण्याची शक्यता आम्हीच निर्माण केली. या संकटावर मात करण्यासाठी आजही आमच्यात तेवढीच हिंमत आहे, जी त्यावेळी होती.''
पंतप्रधान राजपक्षे म्हणाले, "माझ्या कुटुंबाला आणि मला इतर कोणापेक्षाही जास्त अपमान सहन करावा लागला आहे. परंतु आम्हाला अशा अपमानाची सवय झाली आहे. मात्र माझ्या प्रिय मुला-मुलींनो, कृपया आपल्या देशाला दहशतवादापासून वाचवलेल्या युद्धवीरांना त्रास देऊ नका."
इतर महत्वाच्या बातम्या:
- Breaking: पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ यांची बिनविरोध निवड
- Pakistan New Prime Minister: राजीनामा देत 'इम्रान खान' यांनी पाकिस्तानी संसदेतून केलं वॉकआउट
- श्रीलंकेत लाखो तरूणांचा एल्गार, राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्याची केली मागणी
- 45 दिवसांच्या युद्धानंतरही रशियाला कीववर ताबा मिळवता आला नाही, पुतिन यांनी आता 'या' अधिकाऱ्याकडे सोपवली मोहीम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha