एक्स्प्लोर
श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढला, सहा भारतीयांसह 290 जणांचा मृत्यू
श्रीलंकेतील आठ साखळी बॉम्बस्फोटात 290 लोकांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक जण जखमी आहेत.
कोलंबो : श्रीलंकेत रविवारी (21 एप्रिल) झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मृतांचा आकडा वाढला आहे. या बॉम्बस्फोटात सहा भारतीयांसह 290 जणांना मृत्यू झाला आहे, तर 500 हून जास्त लोक जखमी झाले आहेत. रविवारपर्यंत या स्फोटात केरळच्या महिलेसह चार भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. तर आज सकाळी आणखी दोन भारतीयांच्या मृत्यूची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.
श्रीलंकेतील पोलिसांनी सांगितलं की, बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या परदेशी नागरिकांमध्ये सहा भारतीयांचा समावेश आहे. तर सुषमा स्वराज यांनी कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तच्या ट्वीटला रिट्वीट केलं आहे. "काल झालेल्या स्फोटात आणखी दोन भारतीयांचा मृत्यू झाल्याचं सांगताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे. जी हनुमंतरायप्पा आणि एम रंगयप्पा अशी मृतांची नावं आहेत."
श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात 35 परदेशी नागरिक मृत, सर्व भारतीय सुरक्षित, मृतांचा आकडा 207 पार श्रीलंकेत रविवारी स्थानिक वेळेनुसार, सकाळी पाऊणे नऊ वाजता आठ साखळी स्फोट झाले. पहिला स्फोट कोलंबोच्या सेंट अँथनी चर्चमध्ये झाला, दुसरा स्फोट नेगोम्बोच्या सेंट सबॅस्टियन चर्च आणि तिसरा बट्टिकलोवामधील चर्चमध्ये झाला, तसंच तीन पंचतारांकित हॉटलेलाही निशाणा बनवण्यात आलं. यामध्ये शंग्रीला, द सिनामोन ग्रॅण्ड आणि द किंग्जबरी या हॉटेलच समावेश आहे. तर सातवा स्फोट कोलंबोच्या देहीवाला हॉटेलसमोर झाला आणि आठवा स्फोट कोलंबोमध्येच झाला. VIDEO | श्रीलंकेतल्या स्फोटांमागे नॅशनल तौहीद जमात? भारताकडून मदत या आठ साखळी बॉम्बस्फोटात 290 लोकांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक जण जखमी आहेत. यामधील सर्वाधिक स्फोट राजधानी कोलंबोमध्ये झाला आहे. संपूर्ण देशात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. भारताकडून मदत म्हणून एअर इंडियाने 24 एप्रिलपर्यंत कोलंबोहून येणारी-जाणारी तिकीटं रद्द किंवा रिशेड्यूल केल्यास त्यावर शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एयर इंडिया आता नवी दिल्लीहून कोलंबोसाठी दररोज दोन विमानांचं उड्डाण होईल तर चेन्नईहून कोलंबोला जाण्यासाठी एअर इंडिया एक्स्प्रेसची दरोरज एक उड्डाण असेल. सहा भारतीयांसह 35 परदेशी नागरिकांचा मृत्यू परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्ताने सहा भारतीयाच्या मृत्यूची माहिती दिली. लक्ष्मी, नारायण चंद्रशेखर, रमेश, पी एस राजसेना, के. जी हनुमंतरायप्पा आणि एम रंगयप्पा अशी मृतांची नावं आहेत. तर परराष्ट्र सचिव रविनाथा अरियासिंघे म्हणाले की, बॉम्बस्फोटात कमीत कमी 35 परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.@SushmaSwaraj We sadly confirm the deaths of the following two individuals in the blasts yesterday: - K G Hanumantharayappa -M Rangappa.
— India in Sri Lanka (@IndiainSL) April 22, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement