एक्स्प्लोर

पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नाचक्की! 'मुलांना शाळेतून काढलंय, पगार द्या'; सर्बियातील पाकिस्तानी दूतावासाचं ट्वीट

आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचं नाक पुन्हा एकदा कापलं गेलं आहे. कारण सर्बियातील पाक दूतावासनं ( Pak Embassy In Serbia Tweets) केलेल्या एका ट्विटमुळे पाकिस्तानची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे

सर्बिया : आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचं नाक पुन्हा एकदा कापलं गेलं आहे. कारण सर्बियातील पाक दूतावासनं केलेल्या एका ट्विटमुळे पाकिस्तानची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. सर्बियातल्या पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांच्या मुलांना स्थानिक शाळेतून घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कारण मागील अनेक महिन्यांपासून महागाई आणि पाक अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे अधिकाऱ्यांचा पगार झालेला नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना मुलांच्या शाळेची फी भरता आली नाही. परिणामी शाळेनं मुलांना घरी पाठवल्यानं आता अधिकारी वर्ग संतापलाय. या अधिकाऱ्यांनी ट्विट करुन थेट पाक पंतप्रधान इम्रान खान यांनाच घेरलंय. अशा परिस्थितीतही अधिकारी वर्गानं आणखी किती काळ गप्प राहायचं? असा सवाल इम्रान खान यांना विचारणारं ट्विट खुद्द सर्बियातल्या पाक दूतावासानं केलंय.  

पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नाचक्की! 'मुलांना शाळेतून काढलंय, पगार द्या'; सर्बियातील पाकिस्तानी दूतावासाचं ट्वीट

ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, महागाईनं सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. अशात आपण इम्रान खान यांच्याकडून किती अपेक्षा करु शकतो. आपण सरकारी कर्मचारी आहोत. आणि मागील तीन महिन्यांपासून विना वेतन काम करत आहोत. आमच्याकडे मुलांची शाळेची फी भरायलाही पैसे नाहीत. फी न भरल्यानं त्यांना शाळेतून काढून टाकलं आहे, असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. हे ट्वीट नंतर सर्बियातील पाक दूतावासाकडून डिलिट करण्यात आलं आहे. 

पंतप्रधानांची देश चालवायला पैसा नसल्याची कबुली  

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी देश चालवायला पैसा नसल्याची कबुली दिली होती. त्यामुळे सध्या पाकिस्तानला दुसऱ्या देशांकडे मदतीसाठी अबलंबून राहावं लागत आहे. पाकिस्तान सरकारच्या महसूल बोर्डाच्या पहिल्या ट्रॅक आणि ट्रेस यंत्रणेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात इम्रान खान यांनी जनसंबोधन केलं. यावेळी देश चालवण्यासाठी पाकिस्तानकडे पुरेसा पैसा नसल्याची कबुली इम्रान खान यांनी दिली होती. कर संकलनातील व्यत्यय आणि वाढतं परदेशी कर्ज हा सध्या पाकिस्तानचा राष्ट्रीय मुद्दा बनल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं आहे. 

आर्थिक दिलासा मिळण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची मदत घेण्यासही तयार
पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे पाकिस्तानी जनतेपुढील संकटे आणखी वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नं पाकिस्तानसाठी सहा अब्ज डॉलरचे बेलआउट पॅकेज देण्यास सहमती दर्शवली होती. या पॅकेजसाठी आवश्यक तरतुदी खर्च कमी करणे आणि कर वाढवणे पाकिस्ताननं मान्य केल्या आहेत. दरम्यान, वाढत्या महागाईमुळे पुढील दोन महिन्यांत पाऊले उचलावी लागतील, असा खुलासाही यावेळी पाकिस्तान सरकारनं केला आहे. 

संबंधित बातम्या

Pakistan Financial crisis : पाकिस्तानकडे देश चालवायला पैसा नाही, पंतप्रधान इम्रान खान यांची कबुली 

Pakistan Financial Crisis : पाकिस्तानच्या डोक्यावर कर्जाचा वाढता डोंगर, कर्जाचा आकडा पोहोचला 50 लाख कोटींच्या पार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Barfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुलीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6.00 AM : 05 JULY  2024Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget