एक्स्प्लोर
मधुमेहींना दिलासा, स्कीन पॅचने आठवडाभर इन्सुलिनपासून सुटका
टाईप टू डायबिटीज असलेल्या रुग्णांना हा लाभ मिळणार आहे.
न्यूयॉर्क : शुगर असल्यामुळे तुम्हाला रोज इन्सुलिन घ्यावं लागत असेल, तर तुमच्यासाठी अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी दिलासादायक बातमी आणली आहे. संशोधकांनी शोधून काढलेला पॅच हातावर ठेवला, तर आठवड्याभरासाठी तुमची इन्सुलिनपासून सुटका होऊ शकते.
अमेरिकेतील वॉशिंग्टनमधल्या शास्त्रज्ञांनी एक त्वचेचा तुकडा शोधून काढला आहे. हा त्वचेचा पॅच तुमच्या शरीरावर ठेवला, की तुम्हाला आठ दिवस तरी इन्सुलिनचं इंजेक्शन घेण्याची आवश्यकता लागणार आही. टाईप टू डायबिटीज असलेल्या रुग्णांना हा लाभ मिळणार आहे.
अनेक मधुमेही रुग्णांसाठी रोजची इन्सुलिनची इंजेक्शन ही कटकट असते. त्यामुळे होणाऱ्या वेदना हा अनेकांसाठी नित्याचा भाग झाला आहे. मात्र या स्कीन पॅचमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण हा पॅच त्वचेवर लावताना इंजेक्शनपेक्षा कमी वेदना होतात.
या पॅचच्या माध्यमातून इन्सुलिनची गरज पूर्ण केली जाईल. त्यामुळे ज्या पेशन्ट्सना इन्सुलिन घेऊन साखरेचं प्रमाण कमी-जास्त करावं लागतं, त्यांना दिलासा मिळणार आहे.
अमेरिकेतील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ बायोमेडिकल इमेजिंग आणि बायोइंजिनियरिंगमधील शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement