Death Penalty : सिंगापूरमध्ये 20 वर्षांत पहिल्यांदाच महिलेला फाशी; वाचा फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सारीदेवीचा गुन्हा
Death Penalty In Singapore : वीस वर्षांनंतर सिंगापूरमध्ये शुक्रवारी एका महिलेला फाशी देण्यात आली. ड्रग्ज तस्करीत दोषी आढळल्यानंतर महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
Drug Trafficking : सिंगापूरमध्ये (Singapore) शुक्रवारी एका 45 वर्षीय महिलेला (Woman) अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी (Drug trafficking) फाशी देण्यात आली. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलेचं नाव सरीदेवी बिंते जमानी (Saridewi Djamani) असं होतं. 2018 मध्ये सरीदेवी ड्रग हेरॉइनची तस्करी केल्याप्रकरणी दोषी आढळली होती. मात्र, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सिंगापूरमध्ये तब्बल वीस वर्षांनंतर एका महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलेकडे 30 ग्रॅम हेरॉईन बाळगल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. या प्रकरणात सिंगापूरमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. 45 वर्षीय दोषी महिलेला 2018 मध्ये हेरॉईन तस्करीसाठी दोषी ठरविण्यात आले आणि तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, असे केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरो विभागाने (Central Narcotics Bureau Department) सांगितले. विशेष बाब म्हणजे दोनच दिवसांपूर्वी मोहम्मद अजीज बिन हुसैन (Ajij Hussain) नावाच्या व्यक्तीला 50 ग्रॅम हेरॉईन तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरवून फाशी देण्यात आली होती. अशा परिस्थितीत सिंगापूरमध्ये (Singapore) तीन दिवसांच्या आत दुसऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तीन दिवसांत दोन जणांना फाशी
केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरो विभागाने सांगितले की, सरीदेवीने तिच्या दोषी आणि शिक्षेविरुद्ध अपील केले होते. हे अपील 6 ऑक्टोबर 2022 रोजी न्यायालयाने फेटाळले होते. सिंगापूरमध्ये अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा थांबवण्याची मागणी होत असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत दोन जणांना फाशी दिल्यानंतर मानवाधिकार संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
20 वर्षांपूर्वी एका महिलेला फाशी देण्यात आली होती
एएफपीने आपल्या अहवालात सिंगापूर प्रिझन सर्व्हिसचा हवाला देत म्हटले आहे की, येन मे व्होएनला अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी फाशी देण्यात येण्यापूर्वी 2004 नंतर देशात फाशी देण्यात आलेली जमनी ही पहिली महिला होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येन 36 वर्षांची हेअर ड्रेसर होती.
कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर सरकारने मार्च 2022 मध्ये फाशीची शिक्षा पुन्हा सुरू केल्यानंतर ही 15वी फाशीची शिक्षा आहे. यापूर्वी, सुमारे 50 ग्रॅम हेरॉइनच्या तस्करीच्या आरोपाखाली अझीझ बिन हुसैन यांना बुधवारी फाशी देण्यात आली. स्थानिक हक्क गट ट्रान्सफॉर्मेटिव्ह जस्टिस कलेक्टिव्हने शुक्रवारी सांगितले की, आणखी एका दोषीला 3 ऑगस्टला फाशी दिली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या :