एक्स्प्लोर

Israel vs Iran: इस्त्रायलनं नाव घेतलं अण्वस्त्रांचं, पण इराणमध्ये धोकादायक 'जुगार' खेळला जातोय! परिणाम आणखी भयंकर ठरू शकतात

Israel vs Iran : इस्रायलचा हा डाव यशस्वी झाला, तर मध्यपूर्वात नवे सामरिक समीकरण तयार होईल यात शंका नाही, पण जर हा डाव फसला, तर त्याचे परिणाम आणखी भयंकर ठरू शकतात.

Israel vs Iran: गाझापट्टीत नरसंहार सुरुच असतानाच स्वत: अण्वस्त्रधारी असूनही इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला विरोध करत इस्त्रायलने आगळीक केली आहे. इस्त्रायलने 200 फायटर जेटने इराणमध्ये अण्वस्त्र कार्यक्रम, लष्करी तळ आणि एअरबेसवर हल्ला  केला. यामध्ये इराणचे लष्कर प्रमुख आणि आयआरजीसी प्रमुख मृत्यूमुखी पडले. तसेच दोन आण्विक कार्यक्रमातील शास्त्रज्ञही मारले गेले. यानंतर इराणने बॅलेस्टिक मिसाईल आणि ड्रोनने पलटवार केला असून तेलअविवमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक इमारती आणि शहरी भागात इराणी मिसाईल पोहोचल्याने आर्थिक आणि जिवितहानीची शक्यता आहे. यानंतर इस्त्रायलने आणखी हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा मध्य पूर्वेत भडका उडाला असून कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे युद्धखोर इस्त्रायलच्या आगळीकीने मध्य पूर्वेतील हाहाकार आणखी वाढत जाणार आहे यात शंका नाही. मात्र, अण्वस्त्र कार्यक्रम हे नाव असलं, तरी नेत्यानाहू यांनी इराणी जनतेला केलेल्या आवाहनातून जुगार सुद्धा समोर येत आहे. 

इस्त्रायलचा डाव इराणमध्ये यशस्वी होणार का?

इस्रायलचा हा डाव यशस्वी झाला, तर मध्यपूर्वात नवे सामरिक समीकरण तयार होईल यात शंका नाही, पण जर हा डाव फसला, तर त्याचे परिणाम आणखी भयंकर ठरू शकतात. याचा थेट परिणाम अराजकता, गृहे युद्ध, आणि लाखो नागरिकांचे हाल. सध्या परिस्थिती अंधातरी आहे त्यामुळेपुढील दिशा केवळ काळच ठरवेल. इस्रायलने इराणवर केलेले जोरदार लष्करी हल्ले हे केवळ अण्वस्त्र धोका संपवण्यापुरते मर्यादित नसून, त्यामागे अधिक व्यापक आणि धोकादायक हेतू दडला आहे. तो म्हणजे इराणमधील सत्ताबदल घडवून आणणे. पंतप्रधान नेतान्याहू यांनी थेट इराणी जनतेला सत्तेविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन करून, या संघर्षाच्या मूळ उद्दिष्टांची झलक दिली आहे. या हल्ल्यांमध्ये इराणच्या क्रांतिकारी गार्ड्स (IRGC) चे अनेक वरिष्ठ अधिकारी ठार झाले असून, इस्रायलने “अजून बरेच काही उरले आहे” असे स्पष्ट करत लढाई अजून संपलेली नाही असे दर्शवले आहे. इराणनेही तात्काळ प्रत्युत्तर देत इस्रायली सैन्य तळांवर हल्ले चढवले, आणि त्यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे.

सत्ताबदलाची जोखीम

इस्रायलची कल्पना आहे की या हल्ल्यांमुळे इराणमध्ये असंतोष उफाळून येईल आणि सत्ताधारी इस्लामिक शासन उलथवून टाकले जाईल. मात्र ही एक मोठी जोखीमयुक्त रणनीती आहे. इराणमध्ये सत्ता आधीपासूनच IRGC आणि इतर कट्टरपंथी संस्थांच्या हातात आहे. त्या ना निवडून आलेल्या आहेत, ना जनतेच्या दबावाला बघून डगमगतात.

पर्यायांची कमतरता

2022 मध्ये महिला स्वातंत्र्य आंदोलनाने काही काळ इराणला हादरवले होते. परंतु विरोधी गट आपसात नेतृत्वावर, भविष्यातील व्यवस्थेवर आणि धोरणांवर एकमत करू शकले नाहीत. रेझा पहलवी, माजी शाह यांचा मुलगा, काही प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळवतोय पण तो पुरेसा नाही.  MEK (मुझाहिदीन-ए-खल्क) हे एक निर्वासित गट असून, त्यांनी भूतकाळात इराणविरोधी शत्रूंशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे आजही ते वादग्रस्त मानले जातात. याशिवाय लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, आणि राजेशाही समर्थक असे विविध विरोधी गट आहेत, पण त्यांच्यात एकवाक्यता नाही.

इराणचे पर्याय आणि अडचणी

  • इराणसमोरील पर्यायही फारसे आकर्षक नाहीत 
  • हल्ले सुरू ठेवणे : यामुळे इस्रायलचे हल्ले आणखी तीव्र होतील.
  • अमेरिकेशी वाटाघाटी : यामुळे जनतेमध्ये पराभवाची भावना निर्माण होईल.
  • अमेरिकेवर हल्ला : अमेरिका थेट संघर्षात उतरेल, जे इराणसाठी अत्यंत धोकादायक ठरेल.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Embed widget