एक्स्प्लोर

भारतातून दत्तक गेलेली चिमुरडी शेरीन अमेरिकेत मृतावस्थेत?

शेरीन दूध पित नसल्यामुळे 37 वर्षीय वेस्लेने तिला पहाटे तीन वाजता घराबाहेर झाडाखाली उभं राहण्यास सांगितलं. 15 मिनिटांनी तिला पाहण्यासाठी तो बाहेर आला असता, ती कुठेच दिसली नाही.

ऑस्टिन, टेक्सास : बिहारमधील नालंदातून अमेरिकेतील जोडप्याला दत्तक गेलेली चिमुरडी मृतावस्थेत आढळल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तीन वर्षांची शेरीन मॅथ्यूज दोन आठवड्यांपूर्वी घराबाहेरुन बेपत्ता झाली होती. टेक्सासमधील रिचर्डसन सिटीतील घराबाहेरुन शेरीन 7 ऑक्टोबरला बेपत्ता झाली. दूध न प्यायल्यामुळे तिच्या दत्तक वडिलांना तिला शिक्षा म्हणून घराबाहेर उभं केलं होतं. तिच्या घरापासून साधारण अर्धा मैल अंतरावर असलेल्या नाल्यात एका चिमुरडीचा मृतदेह आढळला. हा मृतदेह शेरीनचाच असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शेरीन कोण आहे? टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने 23 जून 2016 रोजी बिहारमधील नालंदात असलेल्या एका अनाथाश्रमातून दीड ते दोन वर्षांची चिमुरडी दत्तक घेतली होती. अमेरिकेला जाण्यापूर्वी तिला 'सरस्वती' असं संबोधलं जायचं. वेस्ले मॅथ्यूज आणि सिनी यांनी तिचं नामकरण शेरीन असं केलं. या दाम्पत्याचं मूळ केरळमध्ये असल्याची माहिती आहे. वेस्ले मॅथ्यूज आणि सिनी यांना त्यांच्या एक वर्षाच्या मुलीसाठी भावंड हवं होतं. त्यामुळे त्यांनी सरस्वतीला दत्तक घेतलं. सरस्वतीच्या जन्मदात्या आई-वडिलांनी तिला गयामध्ये सोडलं होतं. त्यानंतर मदर तेरेसा अनंत सेवा संस्थानाकडून तिचा सांभाळ करण्यात आला. शेरीन दूध पित नसल्यामुळे 37 वर्षीय वेस्लेने तिला पहाटे तीन वाजता घराबाहेर झाडाखाली उभं राहण्यास सांगितलं. 15 मिनिटांनी तिला पाहण्यासाठी तो बाहेर आला असता, ती कुठेच दिसली नाही. विशेष म्हणजे ही घटना घडून पाच तास उलटल्यानंतरही त्यांनी बेपत्ता असल्याची तक्रार दिली नाही. राहत्या घराजवळ जंगली कुत्रे फिरकत असल्याची जाणीव असूनही पालकांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार न नोंदवणं चिंताजनक असल्याचं कोर्टाने सांगितलं. वेस्लेला 7 ऑक्टोबरच्या रात्री रिचर्डसन पोलिसांनी अटक केली. लहान मुलाच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशा परिस्थितीत सोडून दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. अडीच लाख डॉलर्सचा बाँड दिल्यानंतर वेस्लेची सुटका करण्यात आली. मात्र त्याला इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग डिव्हाईस घालण्याची सक्ती असून वेस्लेचा पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. शेरीन बेपत्ता असताना, गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही ट्वीट करुन चिंता व्यक्त केली होती. अमेरिकेतील भारतीय दूतावास यात लक्ष घालून असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?Zero Hour Water Crisis : 1500 लोकसंख्येच्या गावात एकच हँडपंप, पाणी टंचाईचा प्रश्न कसा सुटेल?Zero Hour Full Water Crisis : ना पिण्याचं पाणी, ना जनावरांचा चारा; दुष्काळग्रस्त भागाला दिलासा कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget